Reaction of MIM MLA Imtiyaz jaleel on Maharashtra budget 2016

Share this News:
आमदार इम्तियाज जलील


मागील अर्थसंकल्पात अल्पसंख्याक विभागासाठी जवळपास साडेतीशने कोटी रुपयांचे बजट होते. यावर्षी अल्पसंख्याक विकासाच्या विविध योजना राबविण्यासाठी 405 कोटी रुपयांचे नियतव्य करण्यात आले आहे. अल्पसंख्याक विभागाने 700 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र तेवढा निधी देण्यात आला नाही. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळात हजारो लाभार्थ्यांचे अर्ज धुळ खात पडलेले असतांना तेथील 100 कोटी रुपये खर्च झालेले नाही. यामध्ये अनेक तरुणांचे कर्ज न मिळाल्याने खुप नुकसान झालेले आहे. महाराष्ट्रातील वक्‍फच्या जागांवर अतिक्रमण झालेले आहे. वक्‍फ बोर्डाला अधिक सक्षम करण्यासाठी विशेष पॅकेजची गरज असतांना त्यासाठी तरतुद केले गेली नाही. तेलंगाणा, आंध्रप्रदेश, दिल्ली मध्ये वक्‍फसाठी विशेष पॅकेज दिले जाते. मराठवाडा व विदर्भात नवीन उद्योग यावेत यासाठी औद्योगिक घटकास वीजदारास सवलत देण्यात येणार आहे. मात्र हा जुना निर्णय असून पुन्हा नवीन कवर लावुन तो सादर करण्यात आला आहे. औरंगाबाद हे पर्यटनासाठी जागितक नकाशावर असतांना येथील टुरिझन प्रमोट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे म्हणजे नेमके काय करणार आहे ते सांगितले नाही. यासाठी विशेष तरतुद आवश्‍यक होती. कोणत्याही स्मारकासाठी जनतेचा पैसा वापरु नये साठी मी स्वतः दोन दिवसापुर्वी विधानसभेत आवाज उठविला होता. या बजेट मध्ये स्मारकासाठी निधीची तरतुद नाही. बजट मध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांच्या आरोग्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतुद केली आहे ही निश्‍चित चांगली बाब आहे.