पाटबंधारे विभागाचे निवृत्त सचिव  माधव ओक यांचे निधन

Share this News:

पुणे, दि. १९ ऑगस्ट २०२० : महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाचे निवृत्त सचिव माधव यशवंत ओक (वय ८४) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.



माधव ओक यांचा जन्म १९३५ मध्ये झाला असून त्यांचे शालेय शिक्षण पेरूगेट भावेस्कूल येथे झाले. १९५२ मध्ये संपूर्ण राज्यात शाळांत परीक्षेत ते सर्वप्रथम आले होते. त्यानंतर पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (८०६९) येथून त्यांनी बी. ई. सिव्हील ही पदवी मिळविली आणि महाराष्ट्र शासनाच्या परीक्षेत क्लास १ अशी उच्च श्रेणी मिळवून पाटबंधारे खात्यात रुजू झाले. येलदरी, उजनी, जायकवाडी, धोम असे अनेक प्रकल्प त्यांनी अत्यंत यशस्वीपणे उभारण्यात हातभार लावला. त्यानंतर त्यांनी मंत्रालयात पाटबंधारे खात्याच्या सचिवपदाचा कार्यभार सांभाळला.



अत्यंत हुशार, अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष अशी ओक यांची दैदिप्यमान कारकीर्द राहिली. शिस्तप्रिय असूनही मनमिळावू व हसतमुख स्वभावामुळे ते अत्यंत लोकप्रिय अधिकारी होते. १९९३ मध्ये निवृत्त झाल्यावरही ते अनेक शासकीय संस्थांशी सल्लागार म्हणून निगडीत होते