महिलेच्या पायातून ६ गोळ्या काढण्यात साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी च्या डॉक्टरांना यश

Share this News:

24/9/19, जळगाव- जळगाव  येथे एका बँकेमध्ये सौ. शोभा माळी(वय ५८ वर्ष) या काही कामानिमित्त गेल्या होत्या. त्या बँकेत उभ्या असताना बॅंकेतील सुरक्षारक्षकाच्या बंदुकीमधून चुकून निघालेल्या गोळीमुळे त्या जखमी झाल्या. सुरक्षारक्षकाकडून चुकून गोळी निघाल्यानंतर प्रथम ती एका महिलेच्या पायातून आरपार जाऊन ती सौ शोभा यांच्या पायात घुसली. त्यांना तत्काळ जवळच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. सौ शोभा यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्यातील साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी येथे दाखल करण्यात आले.

साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी येथील डॉक्टरांनी सौ.शोभा यांना तपासले असता त्यांच्या असे लक्षात आले की, शोभा यांच्या पाय आणि घोट्याच्या भागावर जखमा होऊन त्या गोळ्या आत गुंडाळल्या गेल्या होत्या. त्या गोळ्या जर शोभा यांच्या पायामध्ये तशाच राहिल्या असत्या तर त्यांना लीड पॉयजिनिंग मेटालॉसीसचा संसर्ग झाला असता. (लीड पॉयजिनिंग मेटालॉसीस म्हणजे शरीरात घुसलेल्या धातूच्या वस्तूमुळे होणारी विषबाधा). म्हणून डॉक्टरांनी त्यांच्या पायातील गोळ्या काढण्याचा निर्णय घेतला.

याविषयी अधिक माहिती देताना साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी येथील ट्रॉमा सर्जन डॉ. मंगेश पाटील म्हणाले की, “ज्यावेळी शोभा यांना हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले होते त्यावेळी त्त्यांच्या पायाला जखम झाल्यामुळे त्यांना चालता देखील येत नव्हते.”

ते पुढे म्हणाले की, “शोभा यांच्या पायाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ न देता संपूर्ण गोळ्या घोट्यातून काढून टाकणे आणि त्यांचा पाय वाचविणे आवश्यक होते.”

यावेळी बोलताना साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीचे संचालक आणि सांधेरोपणतज्ञ डॉ. नीरज आडकर म्हणाले की, “शोभा यांच्या पायात गोळ्या असल्यामुळे त्या गोळ्या रक्तवाहिन्याच्या जवळ होत्या त्यामुळे शस्त्रक्रिया करताना रक्तवाहिन्यांची काळजी घेणे अतिशय आवश्यक होते.”

यावेळी बोलताना सौ शोभा माळी म्हणाल्या, “ज्यावेळी माझ्या पायाला गोळी लागली त्यावेळी माझा पाय पूर्णपणे बरा होईल असे मला वाटले नव्हते. परंतु साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी येथील डॉक्टरांनी माझ्यावर वेळेत आणि योग्य ते उपचार केल्यामुळे आज माझा पाय व्यवस्थित आहे. त्यामुळे मी साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीचे सर्व डॉक्टर आणि त्यांच्या टीमचे आभार मानते.”

या शस्त्रक्रियेच्या वेळी साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी येथील ट्रॉमा सर्जन डॉ. मंगेश पाटील, साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीचे संचालक आणि सांधेरोपणतज्ञ डॉ. नीरज आडकर आणि साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीच्या भूलतज्ञ डॉ. तृप्ति पारे उपस्थित होते.