महिलांमधील कलागुणांना वाव मिळावा – स्वप्ना गोरे

Share this News:

21/9/2019, पुणे : महिला सक्षम झाल्या असून, जीवनाच्या विविध क्षेत्रात समर्थपणे वाटचाल करत आहेत. घराच्या जबाबदाऱ्या सांभाळत नोकरी, व्यवसायाच्या क्षेत्रातही यश मिळवत आहेत. महिलांमधील निरनिराळ्या कलांना व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. लायन्स क्लबप्रमाणे इतर संस्थांनीही महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करावा. त्यांच्यामधील कौशल्याला आणि कल्पकतेला प्रोत्साहन द्वावे,” असे मत पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी व्यक्त केले.

महिला सक्षमीकरण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ पूना सारसबागतर्फे महिला व्यवसायिकांच्या वस्तूंचे प्रदर्शन मुकुंदनगर येथील शिवशंकर सभागृहात भरविण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन स्वप्ना गोरे यांनी केले. यावेळी क्लबचे अध्यक्ष नितीन मेहता, माजी प्रांतपाल फत्तेचंद रांका, शशिकला रांका, रितू नाईक, योगेश कदम, चैताली पटनी, दिपाली गांधी, आशा ओसवाल, मनीषा शहा आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन रविवारी (२२ सप्टेंबर) सकाळी १०.३० ते रात्री ९ या वेळात खुले राहणार आहे.

समाजीतील गरजू, वंचित रुग्णांना मोफत डायलेसिस करता यावे, यासाठी या प्रदर्शनातून निधी संकलन केले जाते. प्रदर्शनात जवळपास १०० स्टॉल्स उभारण्यात आले असून, यामध्ये घरातील सुशोभित वस्तुंपासून ते कपडे, हाताने बनविलेले कलाप्रकार, शोभेच्या वस्तू, खाद्यपदार्थ यांचा समावेश आहे. नवरात्री निमित्त लाईटवेट घागरा- चोली, कानात व गळ्यात परिधान करायचे दागिने, सजवलेल्या दांडिया व पणत्या, वॉलपेन्टिंग आशा आकर्षक वस्तू देखील मांडण्यात आल्या आहेत. गेली सहा वर्षे हा उपक्रम राबविला जात आहे. यावेळी स्वप्ना गोरे यांनी प्रदर्शनात मांडलेल्या वस्तूंची पहाणी केली आणि महिलांच्या कलाकुसरीचे कौतुक केले.