कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता कडक निर्बंध आवश्यक: रुबल अगरवाल, अतिरिक्त मनपा आयुक्त (जनरल)
पुणे, एप्रिल ३०, २०२०: कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा वाढता संसर्ग,दैनंदिन प्राप्त होणारी आकडेवारी व एकूण परिस्थितीचा विचार करता सोशल डिस्टनिंगसह गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच कडक निर्बंधाची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे त्यानी पाहणीप्रसंगी सांगितले.
पुणे महानगरपालिका,पुणे शहर पोलीस यांच्या वतीने रामटेकडी, सय्यदनगर, चिंतामणीनगर,अप्पर इंदिरानगर,बिबवेवाडी (शेवटचा बस स्टॉप) या परिससराची पाहणी करण्यात आली, रामटेकडी, चिंतामनींनगर,सय्यदनगर येथील पाहणी प्रसंगी मा,सभासद अशोक कांबळे,माजी नगरसेवक मा,फारूक इनामदार,क्षेत्रीय अधिकारी कुंजन जाधव,उपस्थित होते,व अप्पर इंदिरानगर,बिबवेवाडी येथील पाहणीप्रसंगी मा,सभासद सौ,रुपाली धाडवे,मा,सभासद बाळा ओसवाल,मा,भीमा साठे, क्षेत्रीय अधिकारी सोमनाथ बनकर,रवींद्र घोरपडे उपस्थित होते.
वरीलप्रमाणे दोन्ही ठिकाणी मा,सहपोलिस आयुक्त सुनील फुलारी,डीसीपी झोन- ४ चे सुहास बावचे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,क्रांतिकुमार पाटील,सहाययक पोलीस आयुक्त सुनील कलगुटकर ( वानवडी ), मनपा सह आयुक्त सुरेश जगताप,उपायुक्त अविनाश सकपाळ,व अन्य अधिकारी उपस्थितीत होते.
पाहणीप्रसंगी सदरच्या भागातील आढावा घेताना तेथील लोकसंख्या,झोपडपट्टी परिसर,दाट लोकवस्तीचा भाग,संशयित रुग्ण,बाधित रुग्ण,पॉझिटिव्ह रुग्ण,निगेटिव्ह रुग्ण,मृत्यू संख्या,परिसरात आजपर्यंत करण्यात आलेल्या प्रतिबंद्धा त्मक उपाययोजना,मनुष्यबळ, साधनांचा पुरवठा,परिसरातली नागरिकांची समस्या व मागणी,मास्क,निर्जंतुकीकरण करणेकरिता केलेले नियोजन,सार्वजनिक स्वच्छता, नागिकांचे सहकार्य,स्थानिक नागरिक,लोकप्रतिनधी यांचे सूचना,येथील क्षेत्रीय अधिकारी,लोकप्रतिनिधी,पोलीस अधिकारी,स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी,यांच्यातील समन्वय व नियोजनाची कार्यप्रणाली याबाबत सविस्तर चर्चा करणेत आली,सय्यदनगर व बिबवेवाडी येथील परिसरात सुमारे एक हजारापेक्षा अधिक कार्यकर्ते विघ्नहर्ता न्यासचे व मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. आढावा घेताना उपस्थित कार्यकर्ते व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना आजपर्यंत केलेल्या कामकाज व पुढील नियोजन करणेबाबत त्यांचेकडून माहिती घेण्यात आली.
वरीलप्रमाणे आढावा घेताना सर्व ठिकाणी स्थानिक पातळीवर भाजीपाला विक्री प्रसंगी सोशल डिस्टनिंग पाळले जात नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या, या पार्श्वभूमीवर सय्यदनगर व बिबवेवाडी अप्पर इंदिरानगर येथील शेवटचा बस स्टॉप येथील प्रांगणात मार्गदर्शन करताना मा,अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अगरवाल,यांनी सांगितले की, कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधकरिता पुणेकर नागरिक,विविध संस्था,संघटना,मोठ्या प्रमाणावर लढ्यात उतरले आहेत,प्रशासनाच्या वतीने वारंवार सूचना देण्यात येत आहेत,एकूणच परिस्थितीचा विचार करता नागरिकांनी केवळ सोशल डिस्टनिंग पालन करावे,वारंवार हात धुणे,मास्क व निर्जंतुकीकरण वापर,गर्दीत जाणे टाळणे,आवश्यक आहे.
या परिसरात नागरिकांकरिता लागणारे कापडी मास्क,निर्जंतुकीकरण करणेकरिता आवश्यक नियोजन,मनुष्यबळ नियोजन,साधनसामुग्री तातडीने उपलब्ध करून घेणे,त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे मार्गदर्शन व सूचना व सहकार्य तसेच स्वयंसेवी प्रतिनिधींचे सहकार्य याबळावर आपण कोरोना विषाणू प्रादुर्भावावर मात करू शकतो.
वरीलप्रमाणे सर्व भागात भाजीविक्री मुळे नियम पायदळी तुडविले जात असल्याचे सांगण्यात आले, या पार्श्वभूमीवर त्यानी नाराजी व्यक्त करताना सांगितले की,केवळ मेथी,कोथिंबीरच्या खरेदी करण्यामुळे स्वतःचे व इतरांचेही जीव धोक्यात आणू नये,किमान येत्या मे महिन्यात सर्वानीच सामूहिक पणे प्रभावी लढा देउन कोरोनावर मात करू,या लढ्यात आपण यशस्वी होऊ,परंतु लढा देत असताना तुम्ही नागरिकांची काळजी घेत असताना स्वतःच्या काळजी घेण्याबरोबरच कुटुंबीय व इतरांचीही काळजी घेण्याचे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.
याप्रसंगी अतिरिक्त पोलिस आयुक्त,सुनील फुलारी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि, कोरोना विषाणू प्रादुर्भावाला रोखण्याकरिता पुणे मनपा,पोलीस प्रशासन व शासन यंत्रणा अहोरात्र लढा देत आहेत,या लढ्यात पुणेकर, विविध संस्था,संघटना , कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत,नागरिकांनी शासनाच्या सूचना पाळताना केवळ घरीच रहाणे सुरक्षित आहे,विनाकारण बाहेर पडणे,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे,येणाऱ्या तक्रारी या भाजीपाला खरेदी वेळी नियम पाळले जात नाहीत,त्यामुळे नाइलाजास्तव कडक कारवाई करणे आवश्यक झाले आहे,तरी कोरोना लढाई करिता सर्वानीच सहकार्य करावे असे त्यांनी आवाहन केले, पुणे मनपा,पुणे शहर पोलीस,व विघ्नहर्ता न्यास यांचे उत्तम नियोजन-रामटेकडी,चिंतामनींनगर, सय्यदनगर,अप्पर इंदिरानगर,बिबवेवाडी येथील परिसरातील नागरिकांना माहिती देणे,घरनिहाय माहिती घेणे,जनजागृती करणे, हॉस्पिटल्स,फ्लू तपासणी केंद्रे,मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅन,स्थानिक भागातील नागरी समस्या निवारण करण्याचे नियोजन,मास्क,निर्जंतुकीकरण,या प्रकारचे समन्वयाने उत्तम नियोजन होत असल्याचे क्षेत्रीय अधिकारी,पोलीस अधिकारी, व विघ्नहर्ता न्यासच्या कार्यकर्त्यांनी याप्रससंगी सांगितले, याप्रसंगी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डीसीपी झोन–5,चे वरीष्ठ पोलीस अधिकारी सुहास बावचे यांनी केले.