विद्यापीठाला संघाची शाखा करू नका: विद्यार्थ्यांचे आवाहन

Share this News:
5 /8/2019, पुणे :
भोजनाच्या सुविधांसंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात  न्याय्य मागणी मांडत  असताना  अजामीनपात्र गुन्हे दाखल झालेल्या विद्यार्थी आंदोलकांचा पुण्यात युवक क्रांती दल आणि संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला . विद्यार्थ्यांच्या अधिकाराची लढाई चालूच राहिल ‘ अशी  भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांनी सत्काराला उत्तर देताना मांडली.
गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी १० ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर मूक निदर्शने करण्यात येणार आहे.
विद्यापीठाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा करू नका असे  आवाहन विद्यार्थ्यांनी यावेळी बोलताना केले.
सतीश गोरे, सतीश पवार, आकाश दौंडे, आकाश भोसले(मुक्त पत्रकार), कृणाल सपकाळे, मुन्ना आरडे, सोमनाथ लोहार यांचा त्यात समावेश होता .  जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन,घोले रोड,पुणे येथे सांयकाळी ५.३० वाजता हा कार्य्रक्रम झाला .  युवक क्रांती दल,माजी नगरसेविका  रूपाली पाटील-ठोंबरे, दलित पँथर, भीम आर्मी, मनविसे,रिपब्लिकन युवा मोर्चा अशा अनेकांनी एकत्र येऊन हा सत्कार कार्यक्रम आयोजित केला .
  रिफेक्टरी नियमांसंदर्भात आवाज उठवताना   पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या आंदोलक  विद्यार्थ्यांवर   १ एप्रिल २०१९ रोजी    गुन्हे दाखल करण्यात आले होते .  जर अधिकार मागणे गुन्हा असेल आणि अधिकार मागितल्यावर आंदोलकांना गुन्हेगार ठरविण्यात येणार असेल तर या लोकशाही देशामध्ये अशा बोलत्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचे कौतुक करायलाच हवे. या जाणीवेतून हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती संयोजकांनी दिली .
जांबुवंत मनोहर ,रूपाली पाटील-ठोंबरे,संदीप बर्वे ,सागर सावंत ,दिलीपसिंह विश्वकर्मा,दत्ता पोळ,राहुल डंबाळे , समीर गांधी, प्रशांत कनोजिया , सुकेश पासलकर , सुदर्शन चखाले , नागेश भोसले आदी उपस्थित होते .
रिफेक्टरी नियमांसंदर्भात विद्यापीठाचे परिपत्रक युवक क्रांती दलाचे संघटक जांबुवंत मनोहर यांनी या सभेत जाळले.
१० ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर मूक निदर्शने करण्यात येणार आहेत, असे यावेळी जाहीर करण्यात आले.
युवक क्रांती दलाचे कार्यवाह संदीप बर्वे म्हणाले, ‘ कुलगुरूंच्या वर राजेश पांडेच सर्व निर्णय घेताना दिसत आहेत. त्यांना विद्यापीठात ३५३ कलम हा व्यवस्थेविरुध्द लढणाऱ्या कार्यकर्त्यांना अडकविण्याची व्यूहरचना आहे, असा आरोप भीम आर्मीचे दत्ता पोळ यांनी केला. विद्यापीठात बुधवारी, रविवारी संघाची शाखा भरते, असा आरोपही त्यांनी केला. फुले -शाहू -आंबेडकरांच्या विचारसरणीने हा संघर्ष लढावा लागणार आहे.
या विद्यार्थ्यांना अटकपूर्व जामीन मिळवून देणारे वकील अॅड. विजयसिंह ठोंबरे यांचाही अन्वर राजन यांनी केला.
अॅड. ठोंबरे म्हणाले, ‘ कलम ३५३ चा सरकारी यंत्रणांकडून दुरुपयोग होत आहे. आंदोलकांचा आवाज दाबण्यासाठी सर्रास हे कलम वापरले जात आहे.विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी हे सरकारी कर्मचारी संज्ञेत बसत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कामात अडथळा आणण्याच्या गुन्हयाचे कलम लावण्याचा प्रश्नच येत नाही. यापुढेही आम्ही कायदेशीर लढा दिला जाईल. ‘
कुणाल सपकाळे हा आंदोलक म्हणाला, ‘ विद्यापीठातील वातावरण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून दूषित होत आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाणीचे प्रकार होत आहेत. नेहरु विद्यापीठ, रोहित येमुला प्रकरण अशा दडपशाहीच्या वेळी आम्ही गप्प बसलो , म्हणून ही वेळ आली आहे.
आकाश भोसले म्हणाले, ‘ १ एप्रिल चा दडपशाहीचा प्रकार पूर्वनियोजित होता. आंदोलक विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आले . पोलिस हे आदेशावरून काम करीत आहेत.विद्यापीठाचे भोंगळ कारभार, चुकीची भरती यावर पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठवल्याने माझ्यावर ३५३ कलम लावण्याचे षडयंत्र करण्यात आले. कुलगुरूंवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होऊनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. ‘
आंदोलक विद्यार्थी सतीश पवार म्हणाला, ‘ समाज आपल्या सोबत आहे, हे या सत्कारामुळे कळले, याचा आनंद वाटला.
सतीश गोरे म्हणाला, ‘ तरुणांना रोजगार नाहीत.विद्यापीठाचा दर्जा राहिलेला नाही. तरीही प्रश्न उठवले तर दडपशाही केली जाते.विद्याथ्र्यांच्या मनात भीती निर्माण केली जाते.
विद्यापीठाला संघाची शाखा होऊ देणार नाही. इथे प्रत्येक विचारधारेच्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य राखले जावे, या साठी सर्वांनी लढत राहावे.
मुन्ना आरडे हा आंदोलक विद्यार्थी म्हणाला, ‘ कारकिर्द घडविण्यासाठी आम्ही पुण्यात आलो, पण, आमच्या मागे ३५३ कलमाचे झेंगट लावण्यात आले आहे. काही मित्र दुरावले, पण, आमचा लढा चालूच राहिल.
आकाश दौडे हा आंदोलक विद्यार्थी म्हणाला , ‘ दडपशाहीमुळे विद्यापीठातील आंदोलन करण्याबाबत विद्याथ्र्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पण, ‘ शिका आणि संघर्ष करा ‘ हा बाबासाहेबांचा मंत्र ध्यानी घेऊन वाटचाल करणार आहे.
या वेळी बोलताना अन्वर राजन म्हणाले, ‘ सत्याच्या आग्रहासाठी तुरुंगात जायला आंदोलकांनी घाबरु नये. दाखल झालेल्या गुन्हयांमुळे आंदोलक विद्यार्थांचे भवितव्य धोक्यात येणार नाही, कारण ते गुन्हेगार नाहीत.विद्यापीठ प्रशासनाशी गांधीवादी मार्गाने संवाद सुरुच ठेवावा, विद्यार्थी सहभाग, पुणेकरांचा सहभाग  वाढवावा, असा सल्लाही अन्वर राजन यांनी दिला.
विद्यार्थ्यांना एका ताटात दोघा-तिघांना जेवण्याची वेळ येणे , अर्धपोटी राहण्याची वेळ येणे ,ही पुणेकरांसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे.विद्यापीठात, विद्यापीठाबाहेर सर्वांनी एकत्र येऊन चांगली व्यवस्था निर्माण केली पाहिजे. ठराविक विचारांच्या बाजूचे नाही, म्हणून दडपशाही होत असेल, तर त्याही विरोधात ठाम लढा दिला पाहिजे.