सुप्रिया बौध्द विहार व जमायत ए इस्लामी हिंद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ पौर्णिमा व ईद मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न
पुणे लष्कर भागातील सुप्रिया बौध्द विहार व जमायत ए इस्लामी हिंद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ पौर्णिमा व ईद मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला . या कार्यक्रमाची सुरुवात बुध्द वंदनेने झाली . त्यानंतर सविता साळवे यांनी ” बुध्दाचे तत्वज्ञान ” या विषयावर मार्गदर्शन केले .
यावेळी सुधाकर कांबळे यांनी सांगितले कि , भगवान बुद्धांनी मानव हा केंद्रबिंदू धरून धम्माचे तत्वज्ञान जगासमोर मांडले . बुद्धाचे मानव कसा सुखी होईल याचा विचार केला . त्यासाठी पंचशील , आर्य अष्टांग मार्ग त्या काळातल्या समाजाला दिला व त्याचा अवलंब केल्यामुळे मानव दुःखमुक्त होते , ते पटवून दिले .
यावेळी जमायत ए इस्लामी हिंदचे महाराष्ट्रचे सचिव इम्तियाज शेख यांनी रोजाचे महत्व , रोजा हा का व कशाप्रकारे ठेवला जातो . या दिवसात व्यक्तीला दानाचे महत्व कळते आणि व्यक्ती दुसऱ्या प्रति प्रेम भावना बाळगतो . इस्लाम हा शांततेचा संदेश देतो . समाजात समता , बंधुता , न्याय ,स्वातत्र्याची शिकवण देतो . यानंतर करीमुद्दीन शेख यांनी इस्लामचा अर्थ शांतता आहे असे सांगितले .
यानंतर इम्तियाज शेख यांना संविधानाचा ग्रंथ देउन सुनील भोसले यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले . तसेच करीमुद्दीन शेख यांचा सन्मान डॉ सुरेश कठाणे यांनी बुध्द आणि त्यांचा ग्रंथ देऊन केला .
यावेळी उज्वला मोरे , बबिता मोरे , भगिरथी अहिरे , राजेंद्र मोरे , मल्लिकार्जुन सोनकांबळे , प्रल्हाद जाधव , दीपक कांबळे , निलेश कांबळे , सुशील भोसले , महेश चव्हाण , अरुण गायकवाड , प्रविण साळवे , बाळू सोनवणे , दादू कांबळे , भीमराव गंभीर , इरफान शेख , अब्दुल हमीद व बादशहा शेख आदी मान्यवर उपस्थित होते .