भारतीय विद्या भवनमध्ये १६ ऑगस्ट रोजी ‘सुरभी ‘ :मराठी -हिंदी लोकसंगीताची मैफल

पुणे ः
‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘सुरभी ‘ या मराठी -हिंदी लोकसंगीताच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे . हा कार्यक्रम दि. १६ ऑगस्ट २०१९ रोजी , शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, (सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे. ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.
‘अरुणिमा’ प्रस्तुत या कार्यक्रमात लोकसंगीतावर आधारित मराठी -हिंदी चित्रपट गीतांच्या विविध रचना सादर करणार आहेत.शेफाली साकुरीकर ,केतन गोडबोले ,अरुणा अनगळ गाणार आहेत . तर राजेंद्र हसबनीस ,नरेंद्र काळे ,ओंकार पाटणकर साथसंगत करणार आहेत .
हा कार्यक्रम विनामूल्य आहे. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ८२ वा कार्यक्रम आहे