दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनाशी समन्वय ठेवून पूरग्रस्तांपर्यंत मदत वाटप करण्याचे आवाहन

Share this News:

पुणे, दि. 13/8/2019 : ज्या दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना पूरग्रस्तांसाठी मदत करावयाची आहेत्यांनी संबंधित जिल्हाधिका-यांशी संपर्क करुन त्यांच्यामार्फतच मदतीचे साहित्य वाटप करणे आवश्यक आहे,असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 34 (ल) नुसार मदत साहित्य वाटप करताना स्वयंसेवी संस्थांनी कोणताही भेदभाव न बाळगता समान पध्दतीने वाटप करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांना विनंती करण्यात येते कीआपणांस कोणत्याही स्वरुपात पूरग्रस्तांना मदत साहित्य पुरवावयाचे असल्यास संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्या समन्वयाने वाटप करण्यात यावे. जिल्हयाचे संपर्क अधिकारी यांचे नाव व संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.

सांगली – श्रीमती वसुंधरा बारवेजिल्हा पुरवठा अधिकारी- 9307839910

कोल्हापूर- श्रीमती राणी ताटेजिल्हा पुरवठा अधिकारी- 9623389673

श्री रविकांत अडसूळउपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन)- 9923009444

सातारा- श्रीमती स्नेहा किसवेजिल्हा पुरवठा अधिकारी- 9604146186

इतर जिल्ह्यातील ज्या स्वयंसेवी संस्थांना / दानशूर व्यक्तींना मदत साहित्य पुणे येथे जमा करावयाचे आहे, त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयकौन्सिल हॉलपुणे 411001 येथे साहित्य जमा करावे. त्यासाठी संपर्क अधिकारी खालीलप्रमाणे आहेत.

1.  श्रीमती अस्मिता मोरेउपजिल्हाधिकारी – 8412077899

2. श्री विकास भालेरावतहसिलदार – 8007533144

ज्या संस्थांना वा दानशूर व्यक्तींना सरळ या दोन्ही जिल्हयात वाटप करावयाचे आहे त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे पूर्व कल्पना देवून गेल्यास वाटपात समन्वय व सुसूत्रता येईल.

मदत पुरविण्यापूर्वी कोणत्या वस्तूंची त्या जिल्ह्यामध्ये सध्या जास्त गरज आहेयाची माहिती संबधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त करून घ्यावी.

सर्व गरजूंना समान पध्दतीने वाटप होईल व कोणीही पूरग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाहीयासाठी कोणत्याही दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी संस्थेने परस्पर मदत साहित्य वाटप करु नयेअसे नम्र आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी केले आहे

Follow Punekar News: