‘हिंदू राष्ट्राची हृदय स्पंदने ‘ पुस्तकाचे २४ जुलै रोजी प्रकाशन

Share this News:

पुणे :

विवेकानंद केंद्राचे राष्ट्रीय अध्यक्ष पी . परमेश्वरन लिखित ‘हिंदू राष्ट्राची हृदय स्पंदने ‘ या मराठी अनुवादित ग्रंथाचे २४ जुलै रोजी पुण्यात प्रकाशन होणार आहे . ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन होणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख डॉ . अनिरुद्ध देशपांडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत .

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात २४ जुलै ,बुधवार,सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे . विवेकानंद केंद्र(कन्याकुमारी ) या संस्थेचे महाराष्ट्र प्रांत संचालक किरण कीर्तने ,विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .

पी .परमेश्वरन यांच्या गेल्या ५० वर्षातील साहित्याचा संपादित ग्रंथसंग्रह ‘हार्ट बीट्स ऑफ हिंदू नेशन ‘या नावाने इंग्रजीत प्रकाशित झाला असून हा ग्रंथ मराठीत 3 खंडात येत असून दत्ता पंचवाघ ,अरुण करमरकर ,भगवान दातार यांनी 3 खंडांचा भावानुवाद केला आहे . हिंदू राष्ट्राची हृदय स्पंदने ‘हा भावानुवाद म्हणजे 3 खंडांचा संच आहे