कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी अहोरात्र काम सुरू-विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर

Share this News:

पुणे, दि.१४ -कोल्हापूर व सांगली येथील पूरस्थिती निवळत असून पुनर्वसनाच्या दृष्टीने वेगवेगळ्या विभागाची पथके अहोरात्र काम करीत आहे. पुरामुळे मृत झालेल्या व्यक्तींची संख्या ५० एवढी झाली असून शक्य तितक्या लवकर जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डाॕ.दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.

 

आजही आपण सर्व यंत्रणेच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा करून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. काम मोठे असले तरी सर्वांना विश्वासात घेऊन यंत्रणा काम करीत आहे,असे स्पष्ट करून डॉ. म्हैसेकर अधिक माहिती देताना म्हणाले,
पर्जन्यमान :-

सांगली जिल्हयामध्ये आज अखेर एकूण 539.86 मि.मी.इतका पाऊस झालेला असून आजअखेरच्या सरासरी पर्जन्यमानाची तुलना करता 217.66% इतका पाऊस पडला आहे.

कोल्हापूर जिल्हयामध्ये आज अखेर झालेला पाऊस 1663.71 मि.मी. झालेला असून आजअखेरच्या सरासरी पर्जन्यमानाची तुलना करता 126.90% इतका पाऊस पडला आहे

 

महत्त्वाच्या स्थळातील पाण्याची पातळी :-

आयर्विन पुल :- येथील धोका पातळी 45’00” आहे. ती आज दुपारी 4 वाजेपर्यंत 39’01” इतकी आहे.
राजाराम बंधारा :- येथील धोका पातळी 43’00” आहे. ती आज दुपारी 4 वाजेपर्यंत 41’6” आहे.

स्थानांतरित कुटुंब / व्यक्ती माहिती :-

सांगली जिल्हयामध्ये 4 तालुक्यातील 104 गावे बाधित झाली असून यामधील 69067 कुटुंबातील 3,11,220 व्यक्ती सदया स्थानांतरित आहेत. या स्थानांतरित व्यक्तीसाठी आज एकूण 138 तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्हयामध्ये 12 तालुक्यातील 321 गावे पुरामुळे बाधित झालेली असून स्थानांतरित व्यक्तींची संख्या 3,58,091 इतकी आहे व त्यांच्या साठी 224 तात्पुरते निवारा केंद्र सुरु आहेत.

पुरामुळे वेढलेली गावे :-

सांगली जिल्हयामध्ये मिरज व वाळवा या 2 तालुक्यातील एकूण 3 गावांचा संपर्क तुटला असून या गावातील एकूण 4510 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलेले आहे.
कोल्हापूर मध्ये शिरोळ, गगनबावडा, करवीर व हातकणंगले या 4 तालुक्यातील एकूण 16 गावांचा संपर्क तुटल्याने यामधील 47,401 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

पुरामुळे मयत :-

पुणे विभागातील 5 जिल्हयांतील एकूण 50 व्यक्ती मृत पावले असून बेपत्ता व्यक्तींची संख्या 3 इतकी आहे. यामध्ये सांगली जिल्हयातील 24, कोल्हापूरमधील 10, सातारामधील 8, पुणे मधील 7 आणि सोलापूरमधील 1 मयत व्यक्तींचा समावेश आहे. तर सांगली व कोल्हापूर जिल्हयातील अनुक्रमे 1 व 2 व्यक्ती बेपत्ता आहेत.

मृत पावलेली जनावरे:-

पुणे विभागात पुराच्या तडाख्यात गाय व म्हैस वर्गीय 7847 जनावरे, 1065 शेळया-मेंढया तर 166 लहान वासरे व गाढवांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयात 4350 गाय व म्हैस वर्गीय जनावरे, 500 शेळया-मेंढया, 80 लहान वासरे व गाढवांचा समावेश आहे.
कोल्हापूर जिल्हयात 3420 गाय व म्हैस वर्गीय जनावरे, 300 शेळया-मेंढया, 50 लहान वासरे व गाढवांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात 60 गाई व म्हैस वर्गीय जनावरे, 250 शेळया-मेंढया, तर 30 लहान वासरे व गाढवांचा समावेश आहे.
सातारा जिल्हयात 17 गाय व म्हैसवर्गीय जनावरे, 15 शेळया-मेंढया तर 6 लहान वासरे व गाढवांचा समावेश आहे.

घरांची पडझड :-दिनांक 13/8/2019 पर्यंत

सांगली जिल्हयामध्ये पूर्णत :पडझड झालेल्या घरांची संख्या 11 असून या व्यतिरिक्त 1350 घरांची अंशत : पडझड झालेली आहे.
कोल्हापूर मध्ये पूर्णत : पडझड झालेल्या घरांची संख्या 496 असून या व्यतिरिक्त 8478 घरांची अंशत: पडझड झालेली आहे. तसेच 316 गोठयाची पण पडझड झाली आहे.

मदत व बचाव कार्य :-
सांगली जिल्हयामध्ये NDRF यांची एकूण 8 पथके कार्यरत आहेत. बचाव कार्यासाठी 20 बोटी व 176 जवान कार्यरत आहेत.
कोल्हापूर जिल्हयामध्ये NDRF, SDRF व NAVY यांची एकूण 18 पथके व 68 बोटी व 388 जवान कार्यरत आहेत.
वैद्यकीय पथके :-
सांगली जिल्हयामध्ये 107, कोल्हापूर मध्ये 150 व सातारा जिल्हयामध्ये 72 असे एकूण 329 वैद्यकीय पथके सध्या कार्यरत आहेत.

सहाय्यता निधी व मदत वाटप :-
मुख्यमंत्री सहायता निधी करीता पुणे विभागीय आयुक्त कार्यालय मध्ये आतापर्यंत व्यक्ती/संस्था यांनी एकूण 6,25,000 इतक्या रकमेचे धनादेश सूपुर्त केले आहेत.
या व्यतिरिक्त कपडे, बिस्कीट पाकीटे, पाण्याच्या बॉटल, दुध पावडर पाकीटे, मेणबत्त्या, सोलार लाईट व तातडीच्या उपचारासाठी आवश्यक औषधे इत्यादी विविध स्वरुपामध्ये मदत विभागीय आयुक्त कार्यालयास प्राप्त होत आहे.
आजपर्यंत सांगलीसाठी 43 ट्रक व कोल्हापूरसाठी 40 ट्रक असे एकूण 83 ट्रकद्वारे साहित्य पोहचविण्यात आलेले आहे.

महावितरण :- दिनांक 13/8/2019 पर्यंत
सांगली जिल्हयातील 10 – उपकेद्र, 1400 – टान्सफॉर्मर व 86115 ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरु केला आहे.
तसेच कोल्हापूर जिल्हयातील 24 – उपकेंद्र, 2886- टान्सफॉर्मर व 1,88,699 ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरु केला आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्हयातील विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी पुणे, बारामती व सातारा येथून 48 पथके कोल्हापूर येथे व 12 पथके सांगली येथे कार्यरत आहेत. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी लागणारे साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध केलेले आहे.

बँकीग सेवा :-
सांगली जिल्हयातील एकूण 329 एटीएम पैकी 209 एटीएम सुरु करणेत आले आहेत. तथापि, 120 एटीएम अद्यापही बंद आहेत.
कोल्हापूर जिल्हयातील एकूण 647 एटीएम पैकी 390 एटीएम सुरु करणेत आले आहेत. तथापि, 257 एटीएम अद्यापही बंद आहेत.

बंद पुल व बंद रस्त्यांची माहिती :-
सांगली जिल्हयामध्ये एकुण 23 रस्ते बंद आहेत. तसेच पुराच्या पाण्यामुळे 13 पुलावरील वाहतूक सुध्दा बंद आहे.
कोल्हापूर जिल्हयामध्ये एकुण 37 रस्ते बंद आहेत. तसेच पुराच्या पाण्यामुळे 13 पुलावरील वाहतूक सुध्दा बंद आहे.
एस. टी. वाहतूक :-
सांगली जिल्हयामध्ये अद्यापही 30 मार्ग बंद आहेत. कोल्हापूर जिल्हयातील अद्यापही 8 मार्ग बंद आहेत.