भोसरी परिसरातील कामगार आमदार महेश लांडगे यांच्यासोबत; कामगारांच्या प्रतिक्रिया

भोसरी, 12 ऑक्टोबर – आमदार महेश लांडगे यांनी मागील पाच वर्षात केलेली उल्लेखनीय कामे आणि काम करण्याची सर्वसमावेशक शैली यामुळे भोसरी, भोसरी एमआयडीसी आणि परिसरातील सर्व कामगारवर्ग आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी आहे, अशा प्रतिक्रिया सेंच्युरी एंका कंपनीतील कामगारांनी व्यक्त केल्या.
महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी भोसरी एमआयडीसी येथील सेंच्युरी एंका या कंपनीतील कामगारांची भेट घेतली. कामगारांच्या वतीने आमदार महेश लांडगे यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी संतोष शेळके, राजू चित्ते, मनोज ओसवाल, संतोष तापकीर, संजय कुटे, बाळासाहेब पठारे, अरुण धावडे, विशाल साळवी, मच्छिंद्र तरवडे आणि कंपनीतील कामगार उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून शेकडो कामगारांना पूर्णवेळ नोकरी मिळाली आहे. सेवानिवृत्त कर्मचा-यांसाठी नवीन दराप्रमाणे वेतननिश्चिती करून दिली. कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. कामगारांच्या मुलांसाठी स्पर्धा, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आदी उपक्रम राबविण्यात आले आहेत. कामगारांच्या विमा रुग्णालयाच्या मागणीसाठी आमदार महेश लांडगे यांनी विधिमंडळात लक्षवेधी मांडली. गुणवंत कामगारांचा गौरव, बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप केले.
कामगारांशी बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले, आजवर कामगारांचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. कामगाराचा मुलगा असल्याने मला कामगारांच्या समस्या माहिती आहेत. कामगाराचा मुलगा होऊन काम करण्यात आनंद वाटतो. शहराची ओळख कामगार नगरी म्हणून आहे. कामगारांनी आजवर मला खूप प्रेम दिल आहे. अनेक कामगार मागील 5 वर्षात मला भेटले. त्या सर्वांची कामे मार्गी लावली आहेत. कोणत्याही कामगाराची आजवर अडवणूक केली नाही. शहरातील प्रत्येक नागरिकाची सेवा करण्याची माझी जबाबदारी आहे. ती प्रामाणिकपणे मी पार पाडली आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची यापुढे इच्छा आहे. सर्वसमावेशक विकास करण्यासाठी आपली साथ हवी आहे. कोणत्याही कामगाराला यापुढे अडचणी आल्यास एक सहकारी म्हणून मला सांगा मी पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन.