बहुजन समाज पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघामधील उमेदवार हुलगेश चलवादी यांचा ताडीवाला रोड भागात पदयात्रेद्वारे जोरदार प्रचार
13/10/2019, पुणे : बहुजन समाज पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघामधीलअधिकृत उमेदवार हुलगेश मरिअप्पा चलवादी यांचा ताडीवाला रोड भागात पदयात्रेद्वारे जोरदार प्रचार झाला , त्यास मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .
ताडीवाला रोडवरील प्रायव्हेट रोड येथून पदयात्रेस सुरुवात झाली . या पदयात्रेमध्ये हुलगेश मरिअप्पा चलवादी यांचे महिला भगिनीनी औक्षण करून स्वागत केले . यावेळी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचारपत्रक वाटले . बी एस पी के वास्ते . खाली करदो रास्ते , रोजी रोटी दे ना सकी जो सरकार निक्कमी है वो सरकार बदलनी है , संविधान के सन्मान में हुलगेश चलवादी मैदानमें आदी घोषणा देण्यात आल्या .
यावेळी पंचशील चौक , रेल्वे कर्मचारी वसाहत , डिझेल कॉलनी , ताडीवाला रोड भाजी मंडई व प्रायव्हेट रोड येथे पदयात्रा काढण्यात आली .
यावेळी बहुजन समाज पार्टी पश्चिम महाराष्ट्र प्रभारी सुदीप गायकवाड , दिलीप कुसाळे , सोनुभाऊ निकाळजे , मेहमूद जकाते , सुमन गायकवाड , प्रदीप ओव्हाळ , भाऊ शिंदे , लता संसारे , रहिसा राज . रमेश घोडके , संतोष कांबळे , कैलास ओव्हाळ , राज फैय्याज , नामदेव बनसोडे , सुनिल धेंडे , गौतम लोंढे , विनायक खरात , आशिष सावंत , निलेश गायकवाड आदी मान्यवर व कार्यकर्ते सहभागी झाले होते .
हत्तीच्या चिन्हासमोरील बटन दाबून विधानसभेत बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांना निवडून पाठवा , बहुजन समाज पार्टी देशात तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असून बहुजन समाजाचा व देशाचा विकास करण्यासाठी या पक्षाला बहुमताने विजयी करा असे बहुजन समाज पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघामधील अधिकृत उमेदवार हुलगेश मरिअप्पा चलवादी यांनी सांगितले .