एम.सी.ई. सोसायटीच्या वतीने १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक

mce-society.jpg
Share this News:
8 April 2019, पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस)च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रविवार , दि.१४ एप्रिल २०१ रोजी सकाळी ८.३० वा. पासून अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मिरवणुकीचे उद्घाटन ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष पी.ए.इनामदार यांच्या हस्ते होईल. संस्थेचे सचिव लतिफ मगदूम मिरवणुकीचे नेतृत्व करणार आहे . मिरवणुकीचे हे १ वे वर्ष आहे.
संस्थेतील ३० आस्थापनातील १० हजार अल्पसंख्यक,सर्वधर्मीयविद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मिरवणुकीत सहभागी होणार आहे. दरबार ब्रास बॅण्डची दोन पथके, ढोल – ताशा यांचा मिरवणुकीत समावेश करण्यात येणार आहे.राखीव जागांच्या संदर्भात महात्मा गांधी -डॉ आंबेडकर यांच्यातील ‘पुणे करार ‘ हा जिवंत देखावा या अभिवादन मिरवणुकीत सादर केला जाणार आहे .
आझम कॅम्पस येथून मिरवणुकीस प्रारंभ होऊन पुना कॉलेज, गोल्डन ज्युबिली, जुना मोटार स्टँड, पद्मजी पोलीस चौकी, भारत सिनेमा, ए. डी. कॅम्प चौक, मॉडर्न बेकरी चौक, संत नरपतगिरी चौक, वीज वितरण कार्यालय, जिल्हा परिषद, मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सांगता होणार आहे.
अवामी महाज ‘ या सामाजिक संघटनेतर्फे या ठिकाणी मोफत पाणपोई आणि सरबत वाटप केंद्र चे उदघाटन होणार आहे .
दरवर्षी एम.सी.ई संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात.त्यातून महामानवांचे सामाजिक ,शैक्षणिक संदेश प्रसारित केले जातात .