डॉ. यंदेज स्पेशालिटी डे केअर सेंटर तर्फे स्नोअरकॉन 2019 संपन्न
पुणे,7 ऑगस्ट 2019 : डॉ.यंदेज स्पेशालिटी डे केअर सेंटर ने इंडियन असोसिएशन ऑफ सर्जन्स फॉर स्लीप अॅप्निया व असोसिएशन ऑफ ऑटोलरींगोलॉजिस्टस (एओआय)पुणे शाखा यांच्या सहकार्याने स्पेशालिटी डे केअर सेंटर कोथरूड येथे नुकतीच स्नोअरकॉन 2019 ही परिषद आयोजित करण्यात आली होती. घोरण्याच्या समस्येबाबत आयोजित सीएमईमध्ये 50 हून अधिक ईएनटी तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता.
याप्रसंगी स्नोअरकॉनचे अध्यक्ष व आघाडीचे कान,नाक,घसा तज्ज्ञ डॉ.राजीव यंदे तसेच डॉ.विकास अगरवाल,डॉ.सीमाब शेख,डॉ.अशोक पुरोहित,डॉ.गजानन काशिद,चेस्ट फिजिशियन डॉ.अजित कुलकर्णी व स्नोअरकॉन परिषदेचे संचालक आणि कान,नाक,घसा तज्ज्ञ डॉ.सिध्दार्थ यंदे यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन केले.
या परिषदेची संकल्पना डिसिजन मेकींग इन स्नोअरिंग अॅन्ड ओएसएएस मॅनेजमेंट ही होती. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लिप अॅप्निया सिंड्रोम (ओएसएएस) हा झोपेचा एक संभाव्य गंभीर विकार आहे. झोपलेले असताना होणार्या श्वसनाच्या त्रासामुळे रक्तातील प्राणवायूची पातळी खालावते. ओएसएएसचे प्रमुख लक्षण हे घोरणे असते आणि त्याचा संबंध मधुमेह,हायपर टेन्शनशी असू शकतो. तसेच हदयविकार किंवा स्ट्रोकच्या जोखीमेशी देखील याचा संबंध असू शकतो. म्हणूनच यावर वेळीच उपचार गरजेचे असतात. घोरणे हे जरी मोठ्या प्रमाणावर असले तरी याबाबत अजूनही आपल्या येथे जागरूकता नाही.
स्नोअरकॉनमध्ये उपचाराच्या पध्दती व त्याची निवड,शस्त्रक्रिया कधी कराव्यात,कुठल्या शस्त्रक्रिया कराव्यात, पीएपी उपकरणे कशी निवडावी अशा विविध गोष्टींवर तज्ञांनी मार्गदर्शन केले.
