​वाडेश्वर मधील खाद्य पदार्थ मिळणार ३० जून पूर्वीच्याच दरात

Share this News:

पुणे, दि. ६ जुलै : वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर १ जुलैपासून सर्वच गोष्टींच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. खाद्य पदार्थांवर देखील आता १२ % इतका कर लागू होणार आहे. या संदर्भात अनेक ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली असल्याने पुण्यातील वाडेश्वर उपहारगृहाच्या व्यवस्थापनाने वाडेश्वर मधील खाद्यपदार्थ ३० जून पूर्वीच्याच दरात ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ३० जून पूर्वीच्या दरांमध्येच आम्ही जीएसटी सामील करून घेतला असून त्यामुळे ग्राहकांना जादा भूर्दड पडणार नसल्याचेही वाडेश्वर व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता वाडेश्वरच्या सर्व उपहारगृहांमध्ये ३० जून रोजी असलेल्या किमतींमध्येच ग्राहकांना खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.