जिव देण्यासाठी निघालेल्या तरुणीचे प्राण दामिनी पथक आणि हडपसर पोलीसानी वाचवले.

3/9/2019, पुणे – फुरसुंगी उड्डाण पुल परीसरात एक तरुणी जिव देण्यासाठी सैरावैरा फिरत आहे आशी माहीती नागरीकांनी दामिनी पथक आणि हडपसर पोलीसाना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव आणि दामिनी पथकाच्या मार्शल रुपाली टेंगले आणि सोनाली कारंडे यानी घटनास्थळावर धाव घेवून तरुणीला विश्वासात घेतले तरुणीच मन परीवर्तन करुन तिचा पत्ता विचारला आणि घरी मुंढवा पोलीसांच्या हद्दीत असणार्या केशवनगरमध्ये आई वडीलांच्या ताब्यात सुखरुप पोहच केल.

या कामी हडपसर पोलीस स्टेशनचे पो.शि.प्रमोद जाधव,दाद जरांडे यानी मदत केली.

पोलीसांच्या या माणुसकीच्या कामगीरीने आई वडीलांच्या डोळ्यांत पाणी वाहत होते.