चातुर्मासनिमित्त महावीर फूड बँकेतर्फे दहा हजार किलो धान्याचे मोफत वाटप

Share this News:

26 /8/2019, पुणे : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ‘एक मुठ धान्य’ या संकल्पनेतून महावीर फूड बँक व जय आनंद ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागातील संस्थांना चातुर्मासनिमित्त ध्यानाचार्य भगवंत, प. पू. डॉ. शिवमुनीजी म. सा. तथा युवाचार्य प. पू. महेंद्र ऋषीजी म. सा. आदीठाणा 15 यांच्या पवित्र पावन सानिध्यात शिवाचार्य समवसरण वर्धमान सांस्कृतिक भवन येथे दहा हजार किलो धान्याचे मोफत वाटप करण्यात आले. प. पू. राष्ट्रसंत आचार्यसम्राट श्री आनंद ऋषीजी पुण्यप्रदान रथावर पुणेकरांनी धान्य, रोख देणगी प्रदान केली. प्रमिलाबाई नौपतलाल साकला, बी. जे. भंडारी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विजय भंडारी, स्व. शांतीलाल छाजेड (चोपडा) यांचे स्मरणार्थ प्रमोद छाजेड या परिवाराने दिलेल्या देणगीतून हा भव्य उपक्रम घेण्यात आला. यास जवाहरलाल बोथरा, पुष्पा कटारिया, हेमा गदीया, रंजना साकला, संगीता छाजेड यांचे योगदान मिळाले.

 

महावीर फूड बॅंकचे पुणे शहर अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची माहिती दिली. महावीर फुड बँकेने पुणे जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे पाच लाख अकरा हजार किलो धान्य मोफत वाटल्याचे सांगितले. आजचे धान्य वाटप पुणे शहर भाजपच्या अध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळे, नगरसेवक प्रवीण चोरबेले, विजय भंडारी, पोपटलाल ओस्तवाल, राजेश साकला, कमलाबाई भंडारी, जय आनंद ग्रुपचे अध्यक्ष अशोक लोढा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवाचार्य समवसरण येथे पाच हजार श्रावण आणि श्राविका यांनी डॉ. शिवमुनी यांचे ‘शक्ती का स्रोत’ या विषयावरील प्रवचनाचा लाभ घेतला.