सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पूरग्रस्त नागरिकांना मदत

Share this News:

पिंपरी,१७ ऑगस्ट २०१९ : सांगली, कोल्हापूर  जिल्ह्यातील सर्व पूरग्रस्त नागरिकांना योग्य ती मदत व सहकार्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने करण्यात येत आहे व भविष्यात देखील मदतकार्य चालूच राहील, असे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी सांगितले.

      शनिवार दिनांक १७ ऑगस्ट २०१९ रोजी सांगली जिल्ह्यातील रेटणे-हरणाक्ष ता. वाळवा या गावात पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने पूरग्रस्तांना मदत करण्यात आली. तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सौभाग्यवती शैलेजादेवी पाटील व चिरंजीव प्रतिक पाटील यांना भेटून जिल्ह्यातील पुर परिस्थिचा आढावा घेऊन पुरग्रस्तांना आर्थिकदृष्ट्या मदत कशी करता येईल या संदर्भात चर्चा करण्यात आली.

 यावेळी संजोग वाघ्रेरे, प्रवक्ते फजल शेख, संजय लंके,बिपीन नाणेकर, अमोल भोईटे, संतोष वाघेरे, आदि मांन्यवर उपस्थितीत होते. एका कुटुंबाला सांधारण गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळ, साखर, चहा, तेल, मसाले, टूथपेस्ट-पावडर, बिस्कीटे, प्राथमिक उपचारासाठी लागणारे औषधे, साडी, मुलांना ड्रेस, पाणी बॉटल इ. साहित्यांचे किट करून प्रत्येकी कुटंबाला वाटप करण्यात आले. रेटणे-हारणाक्ष गावातील प्रत्येक वाड्या-वस्तीत जाऊन व समक्ष घरी जाऊन ही मदत करण्यात आले. भविष्यात पुढील टप्प्यात प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थी विद्यार्थीनीसाठी शालेय वस्तू, वह्या-पुस्तके व स्टेशनरीची मदत करण्यात येईल, असे संजोग वाघेरे यांनी सांगितले.