Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांना भरघोस यश

Share this News:

3 May 2019, पुणे :- बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा निकाल आज जाहीर झाला. पिंपरीतील गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलचा निकाल ९७ टक्के लागला असून येथील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले असून द्रीष्टी पेशवाणी हिला सर्वाधिक ९६.८ %  गुण मिळाले आहेत. परीक्षेला बसलेल्या ११९ विद्यार्थ्यांपैकी ९७  विद्यार्थी सायन्स तर २२ विद्यार्थी कॉमर्सचे आहेत. यातील ६५ टक्के विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयात  डिस्टींकशन मिळविले आहे.

सायन्स विभागात द्रीष्टी पेशवाणी ला ९६.८ शांमभवी सभाहीत  हिला ९६.६ तर संजीवनी नाथानी हिला ९६.२ टक्के तर कॉमर्स विभागात सृष्टी शर्मा हिला ९५ टक्के अक्षदा फणसाळकर हिला ९२.६ तर सोनाली टक्कर हिला ९२.२ टक्के  मिळाले. ९ विद्यार्थांनी ९५ टक्क्यांहून अधिक तर ३२ विद्यार्थांनी ९० टक्क्यांहून अधिक

  ३२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक तर ६३  विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.

अंशतः दृष्टीहीन असलेल्या सोनाली ठाकूर हिने इंग्लिश मध्ये ९७ तर बिझनेस स्टडीज मध्ये सर्वाधिक ९८ टक्के मिळवत शाळेचे नाव उंचावले आहे.

आमच्या येथील प्रत्येक शिक्षक सकारात्मक विचारांतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो . त्यामुळेच येथील विद्यार्थी शिक्षणाबरोबरच इतर अनेक कौशल्यांमध्ये पारंगत होत आहेत.म्हणूनच मी विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचेही  अभिनंदन करू इच्छ्ते अशा भावना शाळेच्या संचालिका सोनू गुप्ता यांनी मांडल्या .

Follow Punekar News: