Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

पुणे परिमंडलात एक लाखांवर वीजमीटर उपलब्ध वीजमीटरचा कोणताही तुटवडा नाही – महावितरण

Share this News:

पुणे, दि. 12 जून 2019 : महावितरणच्या पुणे परिमंडलात सध्या सिंगल व थ्री फेजचे एकूण 1 लाख 15 हजार 792 मीटर उपलब्ध आहेत. त्यामुळे नवीन वीजजोडणी व नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

 

सजग नागरिक मंचचे अध्यक्ष  विवेक वेलणकर यांनी पुणे परिमंडलात वीजमीटरचा तुटवडा असल्याचा आरोप केला. महावितरणकडून त्याबाबत खुलासा करण्यात आला आहे. याशिवाय गेल्या 2 वर्षात महावितरणकडून पुणे परिमंडलात सिंगल व थ्री फेजचे एकूण 4 लाख 50 हजार 668 नवीन वीजजोडणी व नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी वापरण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

 

पुणे परिमंडलात सद्यस्थितीत सिंगल फेजचे 1 लाख 9 हजार 874 तसेच थ्रीफेजचे 5918 वीजमीटर उपलब्ध आहेत. त्यामुळे वीजमीटरचा कोणताही तुटवडा नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच गेल्या दोन वर्षात सिंगल फेजच्या 2 लाख 78 हजार 975 व थ्री फेजच्या 49089 अशा एकूण 3 लाख 27 हजार 884 नवीन वीजजोडण्या देण्यात आलेल्या आहेत आणि 1 लाख 22 हजार 784 वीजमीटर बदलण्यात आलेले आहेत.

 

महावितरणने मटेरियल मॅनेजमेंटची प्रक्रिया ही ईआरपीच्या (एंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग) माध्यमातून ‘ऑनलाईन’ केलेली झालेली आहे. त्यामुळे साधनसामग्रीची उपलब्धता व पुरवठा ही प्रक्रिया पूर्वीच्या तुलनेत अधिक गतिमान झालेली आहे.

Follow Punekar News: