Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

योग, यज्ञाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची जपवणूक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे दि.13: योग, यज्ञाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची जपवणूक होत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले
यति योग फाऊंडेशनच्या वतीने महालक्ष्मी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल कोश्यारी बोलत होते. यावेळी संस्थापक मोहनानंद यतिजी महाराज, ब्रिगेडियर सदाशिव जावडेकर, संस्थेच्या सचिव उमा देशमुख आदी उपस्थित होते.
देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे मोठे योगदान असल्याचे सांगून राज्यपाल म्हणाले, महाराष्ट्र ही संताची भूमी आहे, संतांच्या कार्यातून संस्कृती जपण्याचे महान कार्य होत असून त्यामध्ये त्यांचा त्यागही महत्वाचा आहे. महाराष्ट्राने तिर्थक्षेत्र, पर्यटनक्षेत्राच्या माध्यमातून संस्कृती जपली आहे.
देश सर्व बाजुंनी प्रगतीकडे झेपावतो आहे. योग व यज्ञाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता ठेवण्यास मदत होते. यति योग फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असून यापुढेही अखंडीत सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यतियोग फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची नितिन गाडगीळ यांनी सविस्तर माहिती दिली.
प्रास्ताविक संस्थापक मोहनानंद यतिजी महाराज यांनी केले. सुत्रसंचालन श्रीमती सुवर्णा लेले यांनी तर आभार आशिष तेसकर यांनी मानले. यावेळी महिला, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
00000

Support Our Journalism Contribute Now