हिंदुत्ववादी संघटनांची नाहक बदनामी करणे, हा काँग्रेसचा अजेंडाच !

just pune things app
Share this News:

*मालेगाव महानगरपालिकेतील एक मोठा घोटाळा उघड करणार असल्याच्या भीतीपोटी आसिफ शेख यांचा सनातनविरोधी कांगावा !*

आज विधानसभेत काँग्रेसी आमदारांनी पुन्हा एकदा सनातन संस्थेची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मालेगावचे काँग्रेसी आमदार आसिफ शेख यांनी ‘सनातनने मला धमकी दिली’ असा बिनबुडाचा आरोप केला. सनातन संस्था आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांनी मालेगाव महानगरपालिकेतील एक मोठा भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. याविषयीची माहिती आम्ही लवकरच उघड करणार आहोत. यामध्ये स्वतःचे नाव येऊ नये, म्हणूनच आसिफ शेख यांनी सनातनविरोधी कांगावा चालू केला आहे; पण सनातन संस्था लवकरच भ्रष्टाचार्‍यांचा बुरखा फाडून भ्रष्टाचारी चेहरा जनतेसमोर आणेल, असे सनातन संस्थेने म्हटले आहे.

भ्रष्टाचाराचा आरोप असलेले विरोधी पक्षनेते श्री. राधाकृष्ण विखेपाटील आणि माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी शेख यांना साथ देत सनातन संस्थेवर बंदीची मागणी केली. हा प्रकार म्हणजे हिंदुत्ववादी संघटनांची बदनामी करण्याचा काँग्रेसचा अजेंडाच आहे. ‘खोटे बोल, पण रेटून बोल’ या काँग्रेसी संस्कृतीनुसार सनातनवर आरोप करणारे विखेपाटील यांनी फरारी आतंकवादी ‘डॉ. झाकीर नाईक याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’कडून 2 कोटी रुपये घेतले’ असे त्यांचेच ज्येष्ठ बंधू श्री. अशोक विखे पाटील यांच्या आरोपावर महाराष्ट्रातील जनतेला उत्तर द्यावे. हे 2 कोटी हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप करून त्यांना बदनाम करण्यासाठी तर घेतले नाहीत ना, याची चौकशी शासनाने करावी, अशी मागणीही सनातन संस्थेने केली आहे.