पुण्यात कोरोनाचे एकूण १६ रूग्ण

पुणे, दि.१५- आज १ व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुणे जिल्ह्यात कोरोनाचे एकूण १६ रुग्ण झाले आहेत.
त्यांच्यावर उपचार सुरू असून या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
पिंपरी- चिंचवड भागातील ही व्यक्ती जपानला जाऊन आली होती.
त्या व्यक्तीची १४ मार्चला चाचणी करण्यात आली, तिचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला.