पूज्य दलाई लामा यांचा ८४ वा वाढदिवस पुणे शहरात साजरा
पुणे , ६ जुलै २०१९ : जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्म गुरु पुज्य दलाई लामा जी यांच्या ८४ व्या वाढदिवसाच्या निम्मिताने आज दलित पँथर ऑफ इंडिया व इंडो तिबेट फ्रेंडशिप संघांच्या वतीने श्रीवत्स अनाथ बालकांची संस्था – ससून रुग्णालय पुणे येथे विशेष अभिष्टचिंतन समारंभ द्वारे साजरा करण्यात आला , या वेळेस भन्ते हर्षवर्धन , भन्ते शिवलिबोधी , भन्ते धम्मधर , भन्ते बुद्धघोष व समस्त संघ बोधी परिवार यांच्या द्वारे बुद्ध आशीर्वाद मंगल गाथा द्वारे पूज्य दलाई लामा यांच्या सुखमय आयुष्यासाठी साठी प्रार्थना करण्यात आली, या वेळेस श्रीवत्स संस्थेस धान्य , शालेय साहित्य , औषधी ,खेळणी , कार्यालयीन उपयोगी वस्तू व सामग्री देण्यात आले . सदर कार्यक्रमाचे आयोजक व स्वागताध्यक्ष मा बाप्पूसाहेब भोसले संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दलित पँथर ऑफ इंडिया व संयुक्त राष्ट्र तिबेट मुक्तीचे भारताचे राजदूत होते , तसेच प्रमुख उपस्तित मा विनोद चव्हाण – अध्यक्ष सम्राट अशोक सेना , राहुल भोसले – अध्यक्ष युवा पँथर , मा महादेव गायकवाड अध्यक्ष दलित पँथर ऑफ इंडिया पुणे शहर , मा धम्मप्रकाश जी , मा विजय ढसाळ , मा सचिन कांबळे , आदी मान्यवर उपस्तित होते . कार्यक्रमाचे सूत्र संचालन मा विनोद चव्हाण यांनी केले .