आरोग्याबाबत बजेटमध्ये उदासीनता का ? : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल चा सवाल

Share this News:

पुणे : आरोग्या सारख्या अतिशय महत्वाच्या गोष्टीकडे केंद्र व राज्य सरकार अंदाजपत्रक डताना  ज्या पद्धतीने  बघत आहे , भरीव तरतूद ही नाही,त्याचा  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल तर्फे निषेध करण्यात आला आहे .  राष्ट्रवादी डॉक्टर सेल पुणे शहर अध्यक्ष डॉ. सुनिल जगताप,कार्याध्यक्ष डॉ. राजेश पवार यांनी पत्रकाद्वारे ही नाराजी व्यक्त केली आहे.

‘जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीत अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात आरोग्यावर एक शब्दही नाही व सर्व सामान्य भारतीयांच्यादृष्टीने प्रत्यक्षातील अशी भरीव तरतूद ही नाही.  माणसाचे आरोग्य हे भारतासारख्या देशामध्ये आता पर्यंतच्या आरोग्यावरील तरतूद बघतानेहमीच अतिशय दुर्लक्षित राहिलेला असा भाग आहे.

जीडेपीच्या तरतुदीमध्ये आरोग्याविषयी कमीत कमी ४ टक्के वाटा असायला पाहिजे असेअर्थतज्ज्ञांचा सल्ला असताना सुध्दा  केंद्र सरकार व राज्य सरकार दोन्हीही या बाबतीत उदासीन दिसत आहेत.

यावेळी आरोग्याच्या मागीलबजेटनुसार आहे तीच तरतूद ठेवण्यात आलेली आहे व त्यामध्ये सर्व सामान्यांसाठी जी आरोग्य विमा योजनांची तरतूद केलेली आहे ती सुद्धामहाराष्ट्रामध्ये सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेली दिसत नाही’,असे डॉ जगताप आणि डॉ पवार यांनी पत्रकात म्हटले आहे.

आरोग्या सारख्या अतिशय महत्वाच्या गोष्टीकडे केंद्र व राज्य सरकार ज्या पद्धतीने बघत आहे त्याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टरसेल तर्फे निषेध करत आहोत.  यामध्ये दोन्ही सरकारांना आरोग्यासाठी भरीव तरतूद करण्याची बुद्धी देवो हि अपेक्षा आहे,असेही त्यांनी म्हटले आहे.