कोरोना संसर्ग विरोधात कोथरूडमध्ये सर्वंकष मोहीम, आमदार चंद्रकांत दादा पाटील यांचा पुढाकार
पुणे -कोरोना संसर्गाच्या विरोधात कोथरूड मतदारसंघाचे आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सर्वंकष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
त्याअंतर्गत विविध वाड्या-वस्त्या, सोसायटी मध्ये निर्जंतुकीकरण औषधांची फवारणी, गरजू व बाहेरगावचे मजूर, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांना सवलतीच्या दरात भोजन वाटप आणि औषध वाटप केले जात आहे. त्याचप्रमाणे वृद्ध नागरिक आणि गरजवंतांना औषध व वैद्यकीय सुविधांचा देखील पुरवठा केला जात आहे.
या सर्व उपक्रमांवर चंद्रकांत दादा पाटील स्वतः कोथरूडमध्ये उपस्थित राहून लक्ष देत आहेत. आज एरंडवणे येथील सात चाळ वसाहत येथे हे उपक्रम राबविले. यावेळी नगरसेवक दीपक पोटे व जयंत भावे यांच्यासह भाजप कोथरूड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष पुनीत जोशी आदी उपस्थित होते. सर्व मतदारसंघात टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी होत आहे.
…
पोळीभाजी केंद्राचा अनेक बॅचलर्सना फायदा
चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरुड मध्ये पाच रुपयात पोळीभाजी केंद्र सुरु केलं असून, याचा फायदा कोथरुड मधील बॅचलर तरुण आणि विद्यार्थ्यांना मिळत आहे.
याबाबत अनेक विद्यार्थ्यांनी फेसबुक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कोथरुड मध्ये शिक्षणासाठी राहिलेल्या विशाल देशपांडे या विद्यार्थ्यांने फेसबुक पोस्ट लिहून या सुविधेबद्दल आभार मानले आहेत.
त्याचबरोबर वयोवृद्धांना भोजन व औषधे घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचाही लाभ कोथरुड मधील अनेक नागरिकांना मिळत आहे, अशी प्रतिक्रिया सोशल मीडिया च्या माध्यमातून कोथरूड वासियांनी व्यक्त केली आहे.
…
कोट –
जनताभिमुख भाजप
सत्तेत असो वा नसो, कायमच जनहिताची धोरणे राबविणे आणि त्यासाठी तळागाळात जाऊन कार्यरत राहणे, ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व लोकप्रतिनिधींची विचारसरणी आहे. याच दृष्टिकोनातून कोथरूडमध्ये कोरोना संसर्ग संकटसमयी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय निकषांनुसार सोशल डिस्टन्स सारख्या सर्व खबरदारीचे पालन केले जात आहे.
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील सर्व स्तरांवरील लोकप्रतिनिधी अशाच जनताभिमुख उपक्रमांमध्ये कार्यरत आहेत.
…
चंद्रकांत दादा पाटील आमदार कोथरूड विधानसभा
प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी