भुकेल्यांना कॅटॅलिस्ट फाऊंडेशनचा आधार, ५५० हून अधिक गरजूंना जेवणाचे वाटप 

पुणे ता. 27/03/2020:  सामाजिक उपक्रमात कायमच सक्रिय असणाऱ्या कॅटॅलिस्ट फाऊंडेशनने आज ५५० अधिक गरजूंना जेवणाचे वाटप केले. प्रामुख्याने विद्यार्थी, असंघटित – रस्त्यावर आश्रय घेतलेले कामगार, भिकारी, सुरक्षा रक्षक, फिरस्ते यांना याचा मोठा लाभ झाला. फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने, महावीर जैन विद्यालयाचे युवराज शहा, डाॅ. धनराज शहा यांनी एकत्रितपणे हा उपक्रम राबाविला.