भारती विद्यापीठ पो स्टे पुणे हरविलेल्या लहान मुलीच्या नातेवाईकांचा शोध
दिनांक २७/६/२०१९ रोजी सकाळी ११.०० वा चे सुमारास महिला नामे वैशाली किरण थोरात यांना लहान मुलगी नामे कु. भक्ती मारूती कांबळे वय ०४ वर्षे ही कात्रज चौकात मिळुन आल्याने त्यांनी सदर मुलीस कात्रज चौकीस आणुन दिले. सदर हरविलेली मुलगी मिळुन आलेबाबत पोउनि लाड यांनी नियंत्रण कक्षास कळविले. व सदर मुलीचे नातेवाईकांचा शोध घेणेकामी पोउनि लाड, पो हवा ५९२ शिंदे, पो शि ८७२७ बदडे, पो शि धायगुडे, पो शि ७६६२ सुळ असे सदर लहान मुलीस घेवुन कात्रज चौकी हद्दीत शोध घेत असताना संतोषनगर या भागात सदर मुलीचे वडिल नामे मारूती नरसिंग कांबळे वय ३३ वर्षे, रा. संतोषनगर, कट्टे यांचे घराशेजारी, संतोषीमाता मंदिर,कात्रज पुणे हे मिळुन आल्याने त्यांनी सदर मुलीस ओळखुन ती त्यांचीच मुलगी असल्याचे सांगीतले. त्याबाबत मुलीचे वडिलांचे आधारकार्ड चेक करून खात्री करून सदरची मुलगी सुखरूप पणे त्यांचे ताब्यात दिली.
सदर हरविलेली मुलगी कु. भक्ती वय ०४ वर्षे हिस परत मिळवुन दिल्या बद्दल तिचे वडिल मारूती कांबळे यांनी कृतज्ञता व्यक्त करून पोलीस दलाचे आभार मानले.