गुन्हे शाखा पिंपरी-चिंचवड तर्फे अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त व्यसनाधीन ते बाबत उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांच्यावतीने डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज व जय हिंद कॉलेज पिंपरी येथे विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थाच्या व्यसनाधीनते संदर्भात उद्बोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस उप निरीक्षक वसंत मुळे यांनी तसेच मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे समुपदेशक अमर राठोड यांनी अमली पदार्थाची व्यसनाधीनता त्याची कारणे,परिणाम व व्यसन मुक्ती चे उपचार या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.