विधानसभेस कॉंग्रेसच्या इच्छुकांनी 6 जुलै पर्यंत अर्ज करावेत : सचिन साठे

Share this News:

पिंपरी (दि. 1 जुलै 2019) : विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये होणार आहेत. या निवडणुकांमध्ये पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडणुक लढण्यास इच्छुक उमेदवारांनी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन शहर कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

इच्छुक उमेदवारांसाठी छापील उमेदवारी अर्ज संत तुकारामनगर, पिंपरी येथील शहर कॉंग्रेसच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. भरलेले अर्ज 6 जुलै 2019 पर्यंत प्रदेश कॉंग्रेस कमिटी कार्यालय मुंबई येथे पोस्ट, ईमेल, कुरिअर, फॅक्स अथवा प्रत्यक्ष जमा करायचे आहेत. या अर्जासोबत सर्वसाधारण वर्गातील उमेदवारासाठी रुपये 15000/- (रुपये पंधरा हजार फक्त) आणि मागासवर्गीय उमेदवारासाठी रुपये 10000/- (रुपये दहा हजार फक्त) पक्षनिधी म्हणून डीडी व्दारे प्रदेश कार्यालयाकडे जमा करावेत, अशीही माहिती प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सूचनेवरून सरचिटणीस ॲड. गणेश पाटील यांनी प्रसिद्धीस दिली आहे.