मिलिटरी कॅन्टीनचे सामान चोरणा-या आरोपींना खडकी पोलीसांनी पकडले
दि. १८/०९/१८ रोजी फिर्यादी यांचा ट्रक कंटेनर सीएसडी कॅन्टीन रेंजहिल्स खडकी गेटचे समोरील मोकळया जागेत लॉक करुन पार्क करुन ठेवले असता यातील आरोपी यांनी कंटेनरच्या मागील दरवाजास लावलेले कुलुप तोडून कंटेनरमध्ये ठेवलेले युनायटेड कंपनीचे ३६ प्रेशर कुकर व ३ इलेक्ट्रीक वॉटर हिटर असा एकूण ४८,६५१/- रु किंमतीचा माल चोरुन नेला म्हणून खडकी पोलीस स्टेशन गु र नं २९९/१८ भादवि ३७९ गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास करीत असताना तपास पथकातील कर्मचारी ठोकळ आण्णा व हेमंत माने यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गुन्हयातील चोरीस गेलेला माल हा आरोपी नामे १.प्रभाकर ऊर्फ देव्या कमलाकर शिंदे वय ३० वर्षे २. शुभम केशव भोसले वय २२ वर्षे यांचेकडे असून त्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
खडकी पो स्टे यांचे सूचनेनुसार तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचून पकडले. दि. २१/०९/१८ रोजी अटक करण्यात आली असून त्यांचेकडून गुन्हयातील चोरीस गेलेले १४,२०२/- रु किंमतीचे युनायटेड कंपनीचे प्रेशर कुकरचे एकूण ११ नग हस्तगत करण्यात आलेले आहे. पुढील अधिक तपास करित आहोत.
सदर कामगिरी परिमंडळ ४ पुणे चे पोलीस उप-आयुक्त प्रसाद अक्कानवरु सो, खडकी विभागाचे सहा. पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते सो यांचे मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री राजेंद्र मोहिते व पोलीस निरीक्षक गुन्हे श्री मुरलीधर करपे, तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरिक्षक निलेशकुमार महाडिक, पोलीस कर्मचारी ठोकळ आण्णा, हेमंत माने, सुरेश गेंगजे, राजकिरण पवार, विशाल मेमाणे, गणेश लोखंडे, किरण घुटे, अनिरुध्द सोनवणे, अनिल जाधव, संदिप गायकवाड, धवल लोणकर यांनी
केलेली आहे.