राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर्स सेल तर्फे ‘डॉक्टर्स डे’ निमित्त रंगला डॉक्टरांचा सन्मान सोहळा !
पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेस डाॅक्टर्स सेल पुणे शहर तर्फे ‘डाॅक्टर्स डे ‘निमित्त वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डाॅक्टरांचा सन्मान सोहळा ३० जून रोजी आयोजित करण्यात आला होता .अण्णाभाऊ साठे सभागृह , (पद्मावती पुणे-सातारा -रस्ता ) येथे रात्री ९ वाजता हा कार्यक्रम झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. चेतन तुपे आणि राष्ट्रवादी काँग्रेस डाॅक्टर्स सेल पुणे शहर अध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांच्या
हस्ते शहरातील नामवंत आणि उपक्रमशील डॉक्टर्स,रुग्णामित्र आणि रक्तदान चळवळीतील संघटकांचा सत्कार करण्यात आला .
पद्मश्री डॉ. सुदाम काटे, डॉ.सुरेश पाटणकर, डॉ.किरण गद्रे,डॉ. अण्णासाहेब बिराजदार, डॉ. रवींद्र कोलते, डॉ. विश्वंभर हुंडेकर, डॉ. अजित कारंजकर , डॉ. फकीम तकमिली, डॉ. योगेश सातव, डॉ. उमेश फडे, डॉ. ज्ञानेश्वर शेळके, डॉ. रवींद्र कोलते, डॉ. प्रसाद राजहंस, नितीन कदम , डॉ. विनोद सातव,राम बांगड,यांचा सत्कार चेतन तुपे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
पद्मश्री डॉ. सुदाम काटे म्हणाले, ‘ पैशाअभावी आदिवासींना आवश्यक उपचार मिळत नाहीत. शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सातपुडा भागातील आदिवासीच्या सिकल सेल व्याधीवर उपचार करण्यासाठी वेळ द्यावा. आर्थिक मदत करावी ‘.
चेतन तुपे म्हणाले, ‘रुग्ण मंडळींचा ताणतणाव कमी करताना डॉक्टरांनी स्वतःवरील ताणतणावही सांभाळावेत. रुग्णसेवेबद्दल डॉक्टरांना सलाम केला पाहिजे. डॉक्टरांवरील हल्ले करणारा समाज भानावर आणायची गरज आहे. ‘
जनरल प्रक्टिसशंर्स असोसिएशन च्या अध्यक्ष डॉ. संगीता खेनट, पिडी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोप पवार, यांचाही सत्कार करण्यात आला
डॉ.मधूसुडन झंवर , डॉ.राजेश पवार,डॉसिद्धार्थ जाधव,डॉ अजित पाटील,डॉ शिवदीप उंद्रे,डॉ सुनील होनराव,डॉ शंतनू जगदाळे,डॉ परशुराम सूर्यवंशी,डॉ प्रताप ठुबे,डॉ प्रदीप उरसळ,डॉ मुश्ताक तांबोळी,डॉ नितीन पाटील,डॉ सुहास लोंढे,डॉ राजेंद्र जगताप ,डॉ गणेश निंबाळकर,डॉ लालासाहेब गायकवाड,डॉ सुलक्षणा जगताप उपस्थित होते.
‘ रस्त्यावरचा अपघात ‘ विषयावरील मूकनाट्य सादर करण्यात आला.तसेच ‘आबा की आयेगी बारात ‘ या विनोदी नाट्याचा आनंद डॉक्टर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लुटला.राष्ट्रवादी काँग्रेस डाॅक्टर्स सेल पुणे शहर अध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांनी प्रास्ताविक केले . आभार डॉ. हेमंत तुसे यांनी मानले