कॅटलिस्ट फाऊंडेशन करणार पूरग्रस्तांना मदत पुणेकरांना पुढे येण्याचे आवाहन

Share this News:

दिनांक :- ९ ऑगस्ट

पुणे: अतिवृष्टीमुळे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रामधील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील लोकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी खासदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक मोहिम राबवण्यात येणार आहे. बापट यांच्या मार्गदर्शनाखाली कॅटलिस्ट फाऊंडेशन वस्तू रुपात मदत गोळा करून पूरग्रस्तांना देणार आहे. या उपक्रमाला पुणेकरांनी ही साथ द्यावी असे आवाहन कॅटलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी केले आहे.

समाजसेवेच्या उदात्त हेतूने स्थापन झालेल्या कॅटलिस्ट फाऊंडेशन मार्फत ही पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करून सांगलीतील नागरिकांना देण्यात येणार आहे. नागरिकांनी जंतुनाशके, डेटॉल, फिनेल, हँड सॅनिटायझर, रूम फ्रेशनर,सीलबंद पॅक केलेले धान्य, डाळी,तेल यांसारखे किराणामालाचे साहित्य याशिवाय कोरडे खाद्यपदार्थ(बिस्किटे, चिवडा,मॅगी), टूथब्रश, टूथपेस्ट,मेणबत्ती, काडेपेटी,टॉर्च, दप्तरे, स्टेशनरी, वह्या,पुस्तके, पेन,शूज, चप्पल,ब्लँकेटस्, सतरंजी,चटई,चादर, बेडशीटस्, महिलांसाठी साडी, टॉवेल, सॅनिटरी नॅपकिन्स पुरुषांसाठी टी- शर्ट्स, बर्मुडा, स्वेटर आणि लहान मुलांचे कपडे, कानटोपी, पाण्याच्या बाटल्या,पत्रावळ्या,प्रथमोपचार साहित्य अशा स्वरुपात मदत द्यावी. असे आवाहन सुनील माने यांनी केले आहे. लोकांच्या सोयीसाठी त्या त्या भागात मदत स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे.

या ठिकाणी देऊ शकता आपली मदत :

शिवाजीनगर – नगरसेवक आदित्य माळवे यांचे शकुंतला नगर निकम उद्यानाजवळील कार्यालय.

संपर्क क्रमांक ९८२२४१५१४१ ,९८६०५८६०७८, ८८०५०३१२४६

औंध- नगरसेवक प्रकाश उर्फ बंडू ढोरे यांचे दूध केंद्राजवळील कार्यालय संपर्क क्रमांक. ९८२२८९०२३७

बाणेर बालेवाडी – नगरसेवक अमोल बालवडकर यांचे बालेवाडीमधील दसरा चौक येथील कार्यालय, संपर्क : ९०१८७९०९९९, ८३८००८८६८६,

शुक्रवार पेठ : नगरसेवक अजय खेडेकर यांचे घोरपडे पेठ खडकमाळ आळी येथील कार्यालय, संपर्क क्रमांक : ७४८८५७५७५७, ८९५७५७५७५७,

कोरेगाव पार्क घोरपडी – नगरसेवक उमेश गायकवाड यांचे मुंढवा येथील मराठी शाळेजवळील तसेच कोरेगाव पार्क लेन नंबर ६ येथील विद्युत नगर हौसिंग सोसायटी मधील कार्यालय संपर्क क्रमांक : मुंढवा,९८२२७०११३३ कोरेगाव पार्क, ९९२२११५००२

कोथरूड – नगरसेवक किरण दगडे पाटील यांचे बँक ऑफ महाराष्ट्र शेजारील उजवी भुसारी कॉलनीतील कार्यालय, संपर्क क्रमांक ७७७५८७७७५२, ९७६७९६४३३४

कॅम्प मध्ये राहणाऱ्या लोकांनी दिलीप गिरमकर यांच्या हिंद तरुण मंडळाच्या कार्यालयामध्ये आपली मदत द्यावी. यासाठी ७७७०००७७७९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

तर सदाशिव पेठेतील नागरिकांनी राघवेंद्र उर्फ बाप्पू मानकर यांच्या निंबाळकर तालमीजवळील कार्यालयात आपली मदत द्यावी. यासाठी ८३८१०७९०७९, ९९६०२२२००९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.