राज्य सरकार मार्फत धोरणात्मक निर्णय घेऊन कोथरूडच्या समस्या सोडवणार -चंद्रकांत पाटील
10/10/2019, पुणे –
कोथरूड करांचे जीवन आनंदी सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी पुणे महापालिकेच्या माध्यमातून विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेतच. त्याला राज्य सरकारच्या धोरणा मार्फत ठोस निर्णय आणि अंमलबजावणीची जोड देण्यात येईल, अशी हमी कोथरूड विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांनी आज येथे दिली.
चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रचारार्थ कोथरूड परिसरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
याप्रसंगी नागरिकांशी संवाद साधताना चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राज्यामध्ये धडाडीने विकास पर्व राबवणारे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा एकदा निवडून द्यायचे आहे. स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्या जातातच. मात्र त्याला राज्य शासनाच्या ठोस नियोजन निर्णय व अंमलबजावणी ची जोड मिळणे अतिशय गरजेचे असते. कोथरूड चे आमदार पुण्याचे पालक मंत्री आणि राज्य सरकारमधील मंत्री या नात्याने चोख नियोजन ठोस निर्णय आणि कालबद्ध अंमलबजावणी या त्रिसूत्रीचा जोरावर आपण दीर्घकालीन नागरी सुविधांचे धोरणात्मक कार्यवाही करणार आहोत.
चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असून राज्य सरकारमधील विकास पर्व अखंडित सुरू ठेवण्यासाठी पुण्यातील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी करा असे आवाहनही चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी केले.