प्रभाग क्रमांक १७ मधील वाहतुकीचा प्रश्न सोडवणार -मुक्ता टिळक

Share this News:

10/10/2019- ‘प्रभाग क्रमांक १७ हा दाट वस्तीचा बाजारपेठेचा भाग असून वाहतूक समस्येचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे या वर उपाय म्हणून बाजारपेठे साठी वेगळे वाहनतळ बांधून इथल्या स्थानिक नागरिकांना वाहतुक कोंडीततून सुटका करण्याचा मानस आहे’.

असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी, शिवसेना , आर पी आय रा स प रयत संघटना महायुतीच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार सौ मुक्ता ताई शैलेश टिळक यांनी रविवार पेठ रास्ता पेठ भागात पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला.

नगरसेविका सुलोचना कोंढरे मतदारसंघाचे अध्यक्ष राजेश येनपुरे ,सरचिटणीस प्रमोद कोंढरे ,संजय देशमुख ,अरविंद कोठारी ,उमेश चव्हाण ,बापु नाईक ,रोहिणी नाईक, सुनंदा गडाळे प्रभागचे अध्यक्ष गणेश पाचेरकर, सचिन सोळंकी महिला आघाडी च्या वैशाली नाईक तेजेंद्र कोंढरे, सागर शिंद उपस्थित होते. या पदयात्रेची सुरवात निवडुंग्या विठोबा पासून होऊन रास्ता पेठ ,दारुवाला पूल मार्गे फडके हौद येथे पदयात्रेची सांगता झाली

जनतेचा विकास हा फक्त भारतीय जनता पक्ष आणि युती सरकारच्या काळातच होत आहे’ असे प्रतिपादन कसबा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार सौ. मुक्ता ताई शैलेश टिळक यांनी केले.

कसबा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार सौ. मुक्ता ताई शैलेश टिळक यांच्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
मीठगंज परिसरातून पदयात्रा सुरू झाली होती. मोमीनपुरा, चाँद तारा चौक, पीएमसी कॉलनी, घोरपडी पेठ भागातील नागरिकांनी पदयात्रेचे स्वागत केले.

चौका चौकात मुक्ता ताईंना ओवळण्यात आले तसेच हार घालून स्वागत करण्यात आले. नगरसेवक अजय खेडेकर, सम्राट थोरात, राजेश येनपुरे, माजी नगरसेवक विष्णू हरिहर, राजू काकडे, राजू परदेशी, अजिझ बागवान, महिला अध्यक्ष वैशाली नाईक, यावेळी उपस्थित होत्या.

सौ. मुक्ता ताई शैलेश टिळक म्हणाल्या, ‘नगरसेवक आणि महापौर पदाच्या कालावधीत जनतेची सेवा करता आली. भेटी दरम्यान जनतेच्या चेहऱ्यावरील समाधान मला आनंद देऊन जातो. मतदार मलाच निवडून देतील असा मला विश्वास आहे.’