इंद्रायणी थडीच्या निमित्ताने भोसरीतील पार्किंग व्यवस्थेमध्ये बदल

Share this News:

भोसरी,29 जानेवारी: इंद्रायणी थडीच्या निमित्ताने भोसरीतील पार्किंग व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलांचा वापर 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान करावा असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे वाहतूक पोलिसांना व स्वयंसेवकांना सहकार्य करावे. जत्रेचा आनंद लुटताना परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्या असेही आवाहन आमदार लांडगे यांनी केले आहे

 

30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान नाशिकफाटा येथून मोशी कडे जातात उड्डाणपुला खाली टू-व्हिलरसाठी भोसरी चौक ते कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहापर्यंत तर फोर व्हिलरसाठी कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये व भोसरी स्मशानभुमि समोर
पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे

 

मोशी कडून नाशिक फाट्याच्या दिशेने जाताना भोसरी उड्डाणपुलाच्या सुरूवातीला हॉटेल सदगुरूच्या मागे, पेट्रोल पंपा शेजारील जागेवर तसेच उड्डाणपुला खाली टू-व्हिलरसाठी कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह ते भोसरी चौक येथे गाड्यांची सोय करण्यात आली आहे.

संत ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, संत तुकाराम मंगल कार्यालय, इंद्रायणी मंगल कार्यालय, कृष्णा-इंदुम्बन मंगल कार्यालय या सर्व मंगल कार्यालयांचे पार्किंग नागरिकांना उपलब्ध आहे.

वाहतुक पोलिसांनी जाहिर केलेले नो पार्किंग झोन

● भोसरी चौक ते कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह रस्त्याच्या दोन्ही बाजूस तसेच उड्डाणपुलाखाली टू-व्हिलर सोडून इतर वाहने (कार,खाजगी बस,ट्रक टेम्पो,हतागाडी) लावण्यास परवानगी नाही.
● कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह ते भोसरी हॉस्पिटल रस्त्याच्या दोन्ही बाजूस कोणत्याही प्रकारची वाहने लावण्यास परवानगी नाही.
● इंद्रायणी थडी गावजत्रा मैदाना समोर रस्त्याच्या दोन्ही बाजूस कोणत्याही प्रकारची वाहने
लावण्यास परवानगी नाही.