भारतीय विद्या भवनमध्ये मोहिनीअट्टम ,भरतनाट्यम ,कत्थक च्या नृत्याविष्काराने जिंकली मने !
पुणे : ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ मोहिनीअट्टम ,भरतनाट्यम ,कत्थक चा नृत्याविष्काराचे आयोजन शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या सहकार्याने , ‘लक्ष्य ‘ या नावाने करण्यात आले होते.’ या कार्यक्रमाला पुणेकर रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला .
हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ५ जुलै २०१९ रोजी ‘भारतीय विद्या भवन’चे ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह’, सेनापती बापट रोड येथे सायंकाळी ६ वाजता झाला.
संगीत नाटक अकादमी पारितोषिक प्राप्त ज्येष्ठ नृत्य गुरु मंदाकिनी त्रिवेदी यांनी मोहिनीअट्टम सादर केले ,श्रुती टेकवडे यांनी भरतनाट्यम तर अमृता गोगटे यांनी कत्थक सादर केले.
‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत झालेला हा ७८ वा कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता.
‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. नीलिमा आद्ये यांनी शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या उपक्रमाची माहिती दिली. नृत्य गुरू सुचेता चाफेकर यांच्याहस्ते मंदाकिनी त्रिवेदी यांचा सत्कार करण्यात आला.