दिव्यांग व सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती निर्मिती उपक्रम

Share this News:
पुणे :
‘पुणे टीचर ऍक्टिव्हिटी ग्रुप तर्फे ‘दिव्यांग व सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक  श्री गणेश मूर्ती तयार करण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
 हा उपक्रम नारायणी धाम मंदिर,कात्रज,पुणे, येथे घेण्यात आला .यामध्ये धनकवडी,बालाजीनगर,कात्रज, आंबेगाव,पुणे परिसरातील एकूण 200 विद्यार्थी व पालक सहभागी झाले.यासाठी झाँसी राव यांनी मार्गदर्शन केले.  या उपक्रमासाठी लागणारी  शाडू माती म्हाळू पार्वती प्रतिष्ठान निलेश निकम यांच्या तर्फे मोफत उपलब्द्ध करण्यात आली .
कार्यक्रम उदघाटन नगरसेवक युवराज बेलदरे,अर्चना शहा,लायन विनय निंबाळकर, लायन सचिन कर्णिक,मोहन दुधाने,गिरीश लिमन या मान्यवरांच्या हस्ते झाले .
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आरती लिमन,दैवत लिमन,अशोक नांगरे,रवींद्र जोशी,हेमंत यादव,अजय बोऱ्हाडे,प्रशांत गडदे,संजय पाटील, मेघना जोशी,पूजा गयावळ,इनामदार,चित्रा शिंदे,सुषमा सोनवले या शिक्षकांनी सहकार्य केले.
‘पुणे टीचर ऍक्टिव्हिटी ग्रुप ‘ पुणे जिल्ह्यात दिव्यांग शाळेत काम करणाऱ्या शिक्षक एकत्र येऊन दर महिन्यातून एकदा सुट्टीच्या दिवसात पुणे परिसरातील दिव्यांग विद्यार्थी एकत्र करून विविध समाजपयोगी उपक्रम घेऊन सहभागी करून आनंद देण्याचे काम  करतो.
दिव्यांग मुलांना समाजासमोर ठाम पणे उभे राहण्यासाठी आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून ऍक्टिव्हिटी ग्रुप कार्यरत  आहे.