फौंडेशन #आस उपक्रम #खास
पुणे प्रतिनिधी
विशाल मुंदडा
पुण्यातील तरुणांच्या एका गटाने स्थापन केलेल्या आस फौंडेशन या संस्थेने आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबवले, व तो पायंडा त्यांनी तसाच सुरु ठेवला आहे. आपण ज्या समाजात वाढलो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून या संस्थेची स्थापना देवेंद्र दासर या तरुणाने केली.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दापोडी येथील सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम येथे जाऊन त्या विद्यार्थ्यांना सरस्वती म्हणजेच पुस्तकांचे वाटप, खाऊ वाटप व विविध स्पर्धा घेऊन बक्षिसांचे वाटप केले.
या आश्रमात 35 मुले आहेत. या सर्वांचा उदरनिर्वाह देणगीदारांच्या देणग्यांवर चालतो. या आश्रमाची स्थापना 1995 साली देविदास सुरवसे यांनी केली.
या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना जी मदत देण्यात आली ती प्रत्यक्षरित्या न देता अप्रत्यक्षरीत्या देण्यात आली. मुलांना प्रत्येक गोष्ट जर आयती मिळू लागली तर ते स्वावलंबी बनणार नाहीत या भावनेतून संस्थेने त्या मुलांसाठी चित्रकला, संगीत खुर्ची, स्मरणशक्ती अशा स्पर्धा घेण्यात आल्या व त्या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या मुलांना बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी इतर विद्यार्थ्यांना वाईट वाटू नये म्हणून त्यांनाही सहभागासाठी बक्षिसे देण्यात आली.
चित्रकला स्पर्धेत मुकुंद मिठे हा विजयी झाला, संगीत खुर्ची स्पर्धेत ओंकार खलसे तर स्मरणशक्ती स्पर्धेत बळीराम पवार हा विजयी झाला.
बक्षिस म्हणून मुलांना शैक्षणिक साहित्य व 30 विविध पुस्तके देण्यात आली. यात डिक्षणरी, सामान्य अध्ययन, गोष्टीची पुस्तके, काही थोर व्यक्तींच्या आत्मचरित्राचा समावेश आहे. विशेष म्हणजे हा सर्व खर्च त्या विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळणाऱ्या स्वखर्चाच्या पैशातून केला आहे. हि कृती म्हणजे त्यांच्या संवेदनशीलतेच प्रतीकच म्हणावं लागेल.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यासागर सोनवणे, अनिकेत हुलावळे, प्रसाद दांडेकर, अक्षय भालेराव, दीपक शिंदे या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.