राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर सरचिटणीस’ पदी गिरीश गुरनानी यांची नियुक्ती

Share this News:

18/9/2019 पुणे :

‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर सरचिटणीस’ पदी गिरीश गुरनानी यांची नियुक्ती झाली आहे.

‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी’ पुणे शहरचे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील व ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस’ चे अध्यक्ष महेश हांडे यांच्या उपस्थितीत मंगळवारी नियुक्ती पत्र देण्यात आले.

गिरीश गुरनानी हे ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’ चे अध्यक्ष आहेत. धडाडीचे नेतृत्व, कुशल संघटक आणि सेवाव्रती असलेले गुरनानी ट्रस्टच्या माध्यमातून पारंपरिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतात. सामाजिक कामाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माणात ते योगदान देतात. अंध शाळेत स्वातंत्रदिन, प्रजासत्ताक दिनी खाऊ वाटप करतात. समाजासाठी काहीतरी सातत्याने करत राहायचे हे त्यांचे ध्येय आहे. यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून कोथरूडमधील कला, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या गुणवंताना ‘कोथरूडभूषण’ या पुरस्काराने गौरविण्यात येते.

‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी’ पक्षाला तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम गुरनानी करतील. पक्षाची ध्येय- धोरणे, स्वाभिमानी विचार जनसामान्यात पोहोचविण्यात तसेच पक्ष संघटन वाढविण्यात गिरीश गुरनानी नक्की यशस्वी होतील अशी आशा आहे, असे विचार ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी’ पुणे शहरचे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी गुरनानी यांचे अभिनंदन करताना काढले.