उत्तेजीत द्रव्य विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी, राज्य शासन कायदा करणार

मुंबई, दि. 4/3/2020 : तरूण वर्ग शरीर बनविण्यासाठी स्टिरॉईडचे अतिसेवन करून मृत्युस बळी पडत असल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून तज्ञांच्या समितीमार्फत अभ्यास करून राज्य शासन डीनीट्रो फिनॉल आणि स्टिरॉईड या उत्तेजीत द्रव्यांच्या ऑनलाईल आणि दुकानात विक्री प्रतिबंधसंदर्भात नवीन कायदा करणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आज विधानसभेत सांगितले.
राष्ट्रीय पातळीवर शरीरसौष्टव स्पर्धेत अव्वल येण्यासाठी उत्तेजित द्रव्यांच्या अतिसेवनाने मृत्यु होत असल्याबाबत सदस्य अमित साटम यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती त्यास उत्तर देताना मंत्री राजेंद्र शिंगणे बोलत होते.
मंत्री शिंगणे म्हणाले, शरीर वाढीसाठी, गर्भपातासाठीची औषधे, स्टिरॉईड, डायनायट्रोफिनॉ
राज्यात व्यायामशाळेत पूरक आहाराच्या माध्यमातून स्टीरॉईडचे घटक असलेले पदार्थ किंवा उत्तेजक घटक वितरीत केले जाते. वजन वाढणे किंवा कमी करणेसाठी ही द्रव्ये दिली जातात. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून अन्न निरीक्षक व औषध निरीक्षक तसेच पोलीस अधिकारी यांच्यासमवेत राज्यातील सर्व व्यायामशाळेची तपासणी पुढील सहा महिन्यात करण्यात येईल. अशा प्रकारचे घटना आढळल्यास संबंधित व्यायाम शाळेवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मुंबई शहरात अन्न व प्रशासन विभागाने व्ही प्रोटीनच्याबाबत विशेष मोहीम राबविली होती. त्याचे २६ नमुने नमुने तपासणी दिले आहेत. अहवाल सकारात्मक आल्यास त्यांनंतर कारवाई केली जाईल.
ठाणे व मुंब्रा येथे नुकतेच दोन जणांचा या उत्तेजक पदार्थांच्या सेवनाने मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. मात्र, पोलीसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केल्याने यासंदर्भात गृह विभागाशी समन्वय साधून योग्य कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री शिंगणे यांनी दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सुधीर मुनगंटीवर, बबनराव पाचपुते, आशिष शेलार, कॅप्टन सेल्व्हन, प्रताप सरनाईक, राम कदम, जयकुमार रावल आदींनी भाग घेतला होता.