सोसायटी ओला कचरा खत प्रकल्पला हडपसर मध्ये उत्कृष्ट प्रतिसाद
हडपसर प्रभाग क्रमांक २६ महमंदवाडी कौसरबाग प्रभागमध्ये एकाच दिवशी 3 सोसायटी मधील ओला कचरा कंपोस्टिंग प्रकल्पांचे उदघाटन पुणे मनपा सहआयुक्त श्री ज्ञानेश्वर मोळक यांच्या हस्ते झाले.
शासन नियमानुसार प्रत्येक सोसायटी ने आपला ओला कचरा जिरवणे बंधनकारक आहे. या नियमाच्या अनुषंगाने हडपसर प्रभागातील सर्व सोसायट्यांना आरोग्य विभागाने प्रकल्प सुरू करण्याच्या नोटिसा दिल्या आणि पाठपुरावा केले, परंतु ज्या सोसायट्या हे करण्यास तयार नाही त्यांच्यावर दंडाच्या कारवाईचा बडगा उचलला गेला. त्याच बरोबर अनेक सोसायट्या हे प्रकल्प सुरू करण्यास पुढे सरसावल्या. याचेच एक उत्कृष्ट उदाहरण हांडेवाडी रोड प्रभाग क्रमांक २६ येथील आहे.
1) दीपक जोग सहकारी गृहसंस्था. 2)सनराईस को ऑप सोसायटी. 3)फिफ्थ अव्हेन्यू को ऑप सोसायटी यांनी त्यांच्या सोसायटीमध्ये ओला कचरा कंपोस्ट खत* प्रकल्प चालू केले. या प्रकल्पांचे उदघाटन सह महापालिका आयुक्त मा.श्री.ज्ञानेश्वर मोळक व स्थानिक नगरसेवक मा.प्रमोदनाना भानगीरे, नगरसेविका मा.नंदाताई लोणकर आणि मा. प्राचिताई आल्हाट यांच्या हस्ते झाले. सनराईस सोसायटी मध्ये कंपोस्ट प्रकल्पाबरोबर रेनहार्वेस्टिंगचे सुद्धा उदघाटन झाले.
“आम्हाला दंडात्मक कारवाई करण्यात आनंद नाही, नियमानुसार जर प्रकल्प चालू नसतील तर आम्हांला आमचे कर्तव्ये बजावावे लागते, परंतु नागरिकांनी हे प्रकल्प चालू केले तर आम्हाला अत्यंत आनंद आहे. नागरिकांचा सहभाग हा स्वच्छ सर्वेक्षण चा महत्वाचा घटक आहे आणि त्यामुळे मानांकनात पुणे नंबर 1 येण्यात मदत होईल.” श्री मोळक म्हणाले.
“नागरिकांची साथ आणि प्रशासना ने आपले काम चोख केले तर आम्हाला व नगरसेवकांना कामाला हुरूप येतो.” सौ आल्हाट म्हणाल्या. घर आणि सोसायटी मध्ये महिला सक्रिय असतात, त्यांनी असेच पुढे आले पाहिजे. कचरा वर्गीकरण करून घरातून केले पाहिजे. बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी पुढे यावे असे मनोगत सौ लोणकर यांनी व्यक्त केले.
“प्रभातील कचरा, डुक्कर समस्या आणि पाणी समस्या दूर करण्यावर आम्ही लक्ष घालत आहोत आणि पुढील या समस्या दूर केल्याशिवाय राहणार नाही” असे आश्वासन प्रमोदनाना भानगिरे यांनी दिले. सॅनिटरी नॅपकिन हा एक घातक कचरा आहे तो पेपर मध्ये गुंढळून, त्यावर लाल कलर चा मोठा डॉट (रेड डॉट) देऊन तो कचरा वेचकाला द्यावा, अशी माहिती मोहल्ला कमिटी उपाध्यक्षा सौ माधुरी गुप्ते सांगितली. वरिष्ठआरोग्य निरीक्षक श्री.संजय धनवट व आरोग्य निरीक्षकश्री.सचिन लडकत, श्री.वसंत ससाणे, श्री.नवनाथ शेलार यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2020 बद्दल माहिती देऊन नागरिकांना सहभागी होण्याचे आव्हान केले. यावेळी सनराईस सोसायटी चे चेअरमन श्री.कल्पक बोरसे, श्री.सचिव गिरीश श्री.बाबर,खजिनदार अनिल साठे, दीपक जोग सह गृह संस्थेचे चेअरमन पांडुरंग उतेकर, सचिव पुरुषोत्तम मेश्राम, खजिनदार अप्पासो वाबळे, सदस्य दत्तात्रय देवदास, अथर्व पूर्वा सोसायटी कमिटी सदस्य प्रमोद माने, गोसावी, सय्यद, फिफ्थ अँव्हेन्यू चे चेअरमन गंगाधर आंबेडकर, सचिव पांडुरंग ढोनुसे, वैभव ढापसे, मोहल्ला कमिटी सदस्य ओम करे, माधुरी गुप्ते, सुनीता माळी, अशोक सोरंगावी, दीपाली कवडे, स्मिता गायकवाड, तसेच प्रभाग अभियंता श्री दळवी साहेब, प्रमोद सातव, सचिन घुले,पदमीनी कांबळे, सुनीता सिरसाट,शीतल लोणकर, अर्चना जगदाळे,सुवर्णा कुलकर्णी आणि तिन्ही सोसायटीतील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हडपसर वॉर्ड ऑफिसर श्री.सुनील यादव यांच्या मार्गदर्शनाखाली व मोहल्ला कमिटी कार्याध्यक्ष श्री. ओम करे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सांगता स्वच्छतेची शपथ देऊन करण्यात आली.