घराची भिंत पडल्याने अडकलेल्या सहा जणांची अग्निशमन दलाकडून सुटका
8 July 2019, ुणे – शहरात दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे पुलगेट बसस्थानक, साईबाबा मंदिराशेजारी असलेल्या एका जुन्या दुमजली घराची भिंत व लगतच घरामधे असलेला जिना पडल्याने त्या कुटूंबातील एकुण सहाजणांना वरच्या मजल्यावरुन अग्निशमन दलाच्या जवानांनी दोर व शिडीच्या साह्याने खाली उतरवत त्यांची सुखरुप सुटका केली. यामधे जेष्ठ महिलेसह दोन लहान मुलांचा देखील समावेश होता.
या कामगिरीमधे केंद्र प्रमुख प्रमोद सोनावणे, वाहन चालक मेहबूब शेख, तांडेल राजेंद्र पायगुडे व जवान राहूल नलावडे, संदिप घडशी, संजय सकपाळ, अतुल खोपडे तसेच पुणे कँन्टोमेंट अग्निशमन जवानांनी सहभाग घेतला.