रुग्णसेवेची शपथ घेत नर्सिंगच्या विद्यार्थीनींनी केले लॅम्प लायटिंग

Jadhavwar Institute College of Nursing
Share this News:

पुणे 27/9/2019: पोलीस अधिकारी, मंत्री, डॉक्टर्स आपले कार्य प्रामाणिकपणे बजावण्यासाठी शपथ घेतात. अशीच नर्सिंगचा कोर्स करताना परिचारिकेने रुग्णाची सेवा करावी यासाठी शपथ घ्यावी लागते. रुग्णसेवेशी निगडीत शपथ या परिचारिकांना घ्यावी लागते. न-हे येथील जाधवर इन्स्टिट्युट कॉलेज आॅफ नर्सिंग येथील नर्सिंगच्या विद्यार्थिनिंनी नुकतीच लॅम्प लायटिंग करून शपथ घेतली. जगातील पहिली परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची रुग्णसेवेशी निगडीत शपथ विद्यार्थिनींनी लॅम्प लायटिंग करून घेतली.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांसह प्राध्यापक, पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. नर्सिंग क्षेत्राशी जोडल्या जाणा-या नव्या परिचारिका सर्वात आधी द नाइटिंगल प्लेज ही रुग्णांच्या सेवेशी निगडीत प्रतिज्ञा घेतात. तसेच यावेळी ज्याप्रमाणे फ्लोरेन्सने मेणबत्ती घेऊन रुग्णांची सेवा केली, त्याचप्रकारे आपण देखील रुग्णांची अविरतपणे सेवा करू व त्यांचा आयुष्यातील अंधार दूर करून त्यांना प्रकाशाकडे नेऊ यासाठी लॅम्प लायटिंग करून शपथ घेतली जाते.
अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, जगातील पहिली परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल या आधुनिक नर्सिंग आंदोलनाच्या जनक मानल्या जातात. त्यांचा जन्म १२ मे १८२० रोजी झाला. त्यांच्या जन्म एका समृद्ध आणि उच्चवर्णीय कुटुंबामध्ये झाला. उच्च कुटुंबात जन्माला आलेल्या फ्लोरेन्स यांनी सेवेचा मार्ग स्वीकारला. त्या काळच्या दवाखान्यातील भयानक परिस्थितीमुळे घरच्यांचा परिचर्येसाठी विरोध होता. परिवाराचा तीव्र विरोध असताना देखील त्यांनी अभावग्रस्त लोकांच्या सेवेचे व्रत घेतले.
क्रिमिया युद्धामध्ये जखमी रुग्णांची त्यांनी खूप सेवा केली होती. या युद्धातील जखमी सैनिकांवर उपचार करून जेव्हा तज्ज्ञ डॉक्टर्स जात असत तेव्हा रात्रीच्या अंधारात मेणबत्तीच्या प्रकाशात त्या रात्रभर जखमी रुग्णांची सेवा, सुश्रुषा करीत असत. त्यामुळे या युद्धानंतर दया आणि सेवेची मूर्ती असलेल्या फ्लोरेन्स नाइटिंगेल द लेडी विथ द लॅम्प या नावाने प्रसिद्ध झाल्या. युद्धानंतर त्यांची प्रसिध्दी इग्लंडमध्ये देखील पोहोचली. यानंतर १९६० साली त्यांनी लंडनमध्ये नर्सिंग स्कूलची स्थापना केली. भारतीय सैनिकांमध्ये स्वच्छता या विषयावर त्यांनी खूप काम केले आहे. त्यामुळे १८७३ साली सैनिकांचा मृत्यूदर ६९ हून कमी होऊन प्रती हजार १८ एवढा झाला. त्यांचा मृत्यू १३ आॅगस्ट १९१० रोजी झाला. प्रत्येक वर्षी भारतात उल्लेखनीय कार्य करणा-या परिचारिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते नॅशनल फ्लोरेन्स नाइटिंगेल अ‍ॅवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित केले जाते.