कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मुख्य बाजारासह खडकी, मोशी, उत्तमनगर आदी उपबाजार आजपासून बंद राहणार*
पुणे,दि.१०: पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा धोका टाळण्यासाठी पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील मुख्य बाजार सह खडकी, मोशी,उत्तमनगर आदी उपबाजार आजपासून बंद राहणार आहेत. या सर्व मार्केट मधील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा बाजार आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
कोरोना चा धोका टाळण्यासाठी पुण्यातील या सर्व मार्केट मधील विविध विभाग बंद राहणार आहेत. फळे, भाजीपाला विभागासह कांदा-बटाटा बाजार पूर्णपणे बंद राहतील. या सर्व बाजारातील भुसार आणि कडधान्य विभाग मात्र सुरु राहणार आहेत. सर्व शेतकरी आडते, व्यापारी, कामगार व टेम्पो चालक या सर्व बाजार घटकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन डॉ.म्हैसेकर यांनी केले आहे.