कोथरूड भूषण’ पुरस्कार २०१९ ची उत्सुकता शिगेला कोण ठरणार मानकरी याकडे सर्वांचे लक्ष

31 July 2019, पुणे :
‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’ च्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा कोथरूड भूषण पुरस्कार लवकरच जाहीर होणार आहे. शहरातील कोथरूड परिसरात प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या आणि कोथरूडची शान असलेल्या यंदाच्या २०१९ पुरस्काराचा पुरस्कारार्थी कोण ही उत्सुकता सगळ्यांना लागली आहे, अशी माहिती ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’ चे संस्थापक राहुल म्हस्के आणि अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी दिली.
गेल्या ७ वर्षांपासून कोथरूडमधील कला, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या गुणवंताना ट्रस्टच्या वतीने ‘कोथरूड भूषण’ या पुरस्काराने गौरविण्यात येते. या पुरस्कारामुळे आपल्या कलेच्या माध्यमातून भविष्यात उभारी घेणाऱ्यांना मदत होते.
दिनांक २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या दहीहंडी उत्सवात हा पुरस्कार दिला जाणार आहे. हा कार्यक्रम शिक्षकनगर, खेळाचे मैदान उत्सव मंगल कार्यलयाशेजारी, कोथरूड येथे होणार आहे. ‘बढेकर ग्रुप’, ‘वेंकीज’ आणि ‘गोयल गंगा ग्रुप’ हे कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक आहेत, अशी माहिती ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’ चे संस्थापक राहुल म्हस्के आणि अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी पत्रकाद्वारे दिली.
या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे समाजात काहीतरी करू इच्छिणाऱ्या, परिस्थितीशी झगडणाऱ्या कोथरूडमधील गुणवंत, कलावंताना ट्रस्ट पुरस्कार देते. हा पुरस्कार ट्रस्टच्या दहीहंडी उत्सवादरम्यान नामवंत कलाकाराच्या हस्ते प्रदान करण्यात येतो. कोथरूड पुरस्कार मिळणं म्हणजे करिअरमध्ये यशाची गुढी उभारण्यासारखं असतं’ अशी प्रतिक्रिया आत्तापर्यंच्या पुरस्कार्थींनी दिली आहे.
आत्तापर्यंत २०१३ साठी झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप रियालिटी शो’ मधील गायिका सायली पानसे यांना, २०१४ मध्ये गिर्यारोहक आनंद माळी यांना, २०१५ मध्ये प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, कलाकार प्रवीण तरडे, २०१६ मध्ये मोटोक्रॉस बेस्ट रायडर ऋग्वेद बारगुजे याला, २०१७ मध्ये गिरीप्रेमी किशोर धनकुडे यांना २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय व महाराष्ट्र स्तरीय कब्बडीपटू सागर खळदकर यांना गौरविण्यात आले.