महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटतर्फे तय्यबिया अनाथ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबत शालेय साहित्य वाटप

Share this News:

महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यक विभागाचे अध्यक्ष नदीम मुजावर यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे लष्कर भागातील ईस्ट स्ट्रीटवरील तय्यबिया अनाथ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबत केक कापून साजरा करण्यात आला . यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व लाडू वाटप संस्थापक नदीम मुजावर यांच्याहस्ते करण्यात आले .

यावेळी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे कोअर कमिटी सदस्य शाहबुद्दीन शेख , पुणे शहर अध्यक्ष असिफ अली कुरेशी ,नाहिद मुजावर , समद शेख , इलियास पटेल , ख्वाजाभाई , सल्लागार शहाजी सावंत , मुस्तफा कपाडिया , मेहबूब पठाण , सादिक शेख , नईम शेख , इस्माईल चौधरी , मुनीर शेख , शरीफ खान , समद शेख , नूर अरब , जॉन्सन वर्गीस , अजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते .