सीएमए भोंबे यांची रिजनल कौंसिल  सदस्यपदी निवड  

Share this News:
पिंपरी: दि इंस्टीट्यूट ऑफ़ कॉस्ट अकौंटंट ऑफ़ इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या आलेल्या सेंट्रल व रिजनल कौन्सिलच्या मेंबरच्या निवडणुकीमध्ये  सीएमए महेंद्र भोंबे हे भरघोस मताने  निवडून आले.
 सीएमए तर्फे सेंट्रल व प. विभागाच्या सदस्य पदासाठी  या निवडणुका घेण्यात आल्या.या निवडणुकीमध्ये भोंबे हे निवडून आल्याने  प.विभागाच्या कार्यकारिणी मध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. लवकरच त्यांच्यावर मोठ्या जबाबदारीचे पद मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी भोंबे यांनी  कॉस्ट अकौंटंट पिंपरी- चिंचवड- आकुर्डी चॅप्टरचे अध्यक्षपद भूषविले आहे.
या यशाबद्दल पिंपरी चिंचवड शाखाद्यक्ष सीएमए जयंत हंपीहोळी यांनी अभिनंदन केले.