विस्थापित आदिवासी नागरिक यांच्या प्रवासाच्या नियोजनाकरीता अधिका-यांची नियुक्ती -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Pune District Collector office
Share this News:

पुणे दि.2 : – आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात व इतरत्र प्रवास करीत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण पुणे शहरातही आढळून आल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तात्काळ उपाययोजना आखणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेअन्वये विस्थापित आदिवासी नागरिक यांचे प्रवासाकरीताआदेश निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार सदर व्यक्तींची प्रवास व्यवस्था व त्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच अधिकारी, कर्मचा-यांची आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

 

घोडेगावचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. रामभाऊ पंदुरे, (मो. 9850549740) पुणे जिल्हयातून बाहेरच्या राज्यामध्ये, जिल्हयात जाणा-या आदिवासी नागरिकांना त्या त्या संबधित राज्य, जिल्हयाकडून परवानगी घेणे. तसेच संबंधित कामगारांची स्क्रिनिंग झालेबाबतची खात्री करणे, परवानगी पत्र तयार करुन घेणे, व त्यांना संबंधित त्या त्या राज्यामध्ये, पाठविण्याची व्यवस्था करणे, बाहेरच्या राज्यातून,जिल्हयातून पुणे जिल्हयात येणा-या आदिवासी नागरिकांची (परराज्यातून,जिल्हयातुन येणारे) यांची वैद्यकीय तपासणी करणे, त्यांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करणे. तसेच संबंधिताना त्यांचे रहिवास ठिकाणी पोहोच करण्याची व्यवस्था करणे याकरिता उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, आदिवासी प्रकल्प घोडेगांव श्री. जितेंद्र डुड्डी, यांचेशी समन्वय साधुन कार्यवाही करणे. तसेच संदर्भिय आदेशामधील Annexure A प B (SOP) प्रमाणे कार्यवाही करणेबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राम यांनी दिले आहेत.